“आमच्यासाठी ही वेळ..”; अल्लू अर्जुनच्या घराच्या मोडतोडप्रकरणी अखेर वडिलांनी सोडलं मौन

“आमच्यासाठी ही वेळ..”; अल्लू अर्जुनच्या घराच्या मोडतोडप्रकरणी अखेर वडिलांनी सोडलं मौन

‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे वादात अडकलेला दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या हैदराबाद इथल्या घराची मोडतोड करण्यात आली. आंदोलकांनी अभिनेत्याविरोधात घोषणाबाजी केली तसंच महिलेल्या न्याय देण्याची मागणी केली. 4 डिसेंबर रोजी ‘संध्या’ थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’च्या प्रीमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर तिचा नऊ वर्षांचा मुलगा बेशुद्ध झाला होता. त्यावेळी चित्रपट पाहण्यास गेलेल्या अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली होती. रविवारी घराच्या मोडतोडीच्या घटनेनंतर अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी माध्यमांशी बोलताना अल्लू अरविंद म्हणाले, “आमच्या घरात आज काय केलं ते प्रत्येकाने पाहिलंय. पण या घडीला आम्हाला विचारपूर्वक वागावं लागणार आहे. आमच्यासाठी आता कोणतीही प्रतिक्रिया देण्याची ही योग्य वेळ नाही. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. आमच्या घराजवळ येऊन जो कोणी गोंधळ निर्माण करेल. त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील. अशा घटनांना कोणीच प्रोत्साहन देऊ नये. इथे मीडिया आहे म्हणून मी ही प्रतिक्रिया देत नाहीये. आता संयमाने वागण्याची ही वेळ आहे. कायद्यानुसार सर्व गोष्टी होतील.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

रविवारी अल्लू अर्जुनच्या घराची मोडतोड करणाऱ्या आंदोलक कार्यकर्त्यांनी ‘उस्मानिया विद्यापीठ संयुक्त कारवाई समिती’चे (OU JAC) सदस्य असल्याचा दावा केला आहे. दरम्यान आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यात आंदोलक अल्लू अर्जुनच्या घरावर दगड, टोमॅटो फेकताना आणि झाडांच्या कुंड्या फेकताना दिसून येत आहेत.

चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या रेवती या महिलेसाठी आंदोलक न्यायाची मागणी करत होते. दरम्यान, तेलंगणाचे पोलीस महासंचालक जितेंद्र यांनी चित्रपट कलाकारांनी आणि अन्य सर्वांनी नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचं समजून घ्यावं आणि त्यानुसारच वागणूक ठेवावी, असा सल्ला दिला. 4 डिसेंबर रोजी चेंगराचेंगरीची घटना घडली. संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या प्रीमिअरचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अल्लू अर्जुन पोहोचल्यानंतर त्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आणि त्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिच्या नऊ वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वाल्मिकी कराडवर एकट्या परळीत 23 गुन्हे, मुख्यमंत्र्यांकडे गुन्ह्यांची यादीच देणार; अंजली दमानिया म्हणाल्या, त्याला मोकाट… वाल्मिकी कराडवर एकट्या परळीत 23 गुन्हे, मुख्यमंत्र्यांकडे गुन्ह्यांची यादीच देणार; अंजली दमानिया म्हणाल्या, त्याला मोकाट…
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण राज्यभरात तर गाजलचं पण हिवाळी...
वरुण धवनच्या हातांवरच त्याने सोडले प्राण; अभिनेत्याला अश्रू अनावर, म्हणाला “मी रामायण वाचू लागलो..”
सेलिब्रिटींची मुलं शिकणाऱ्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची फी किती? ऐश्वर्या-अभिषेक आराध्यासाठी भरतात इतके लाख
अन् झहीरने सोनाक्षीला अचानक दिला धक्का..; वैतागून अभिनेत्री म्हणाली ‘हा मुलगा शांतीने..’
पोट फुगतंय? छातीत जळजळतंय, आई गं… अपचन होतंय? मग हा उपाय कराच
Border Gavaskar Trophy 2024 – विराट कोहलीला ब्रायन लाराचा विक्रम मोडण्याची संधी, कराव्या लागणार ‘इतक्या’ धावा
लाडक्या बहि‍णींना डिसेंबरमध्ये पैसे मिळणारच नाही? आता पाहावी लागणार जानेवारीची वाट