बीड परभणीतील घटना गंभीर; महाराष्ट्राची प्रतिमा मलिन! शरद पवारांची प्रतिक्रिया
परभणी आणि बीड जिल्ह्यातील दुर्दैवी घटनांनी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. या घटनांबद्दल तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी म्हटले आहे. ते शनिवारी परभणीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. परभणी आणि बीड जिल्ह्यात घडलेल्या घटना अतिशय गंभीर असून दोषींवर कठोक कारवाई झाली पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले.
शरद पवार शनिवारी परभणी जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी न्यायालयीन कोठडी दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी या मृत झालेल्या युवकाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्याचबरोबर संविधानाच्या प्रतिकृतीची जी विटंबना झाली त्या पुतळा परिसराला भेट दिली. त्यावेळी परभणीतील पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, या दोन्ही घटना अत्यंत दुर्दैवी आहेत. अशा घटनांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होते. या घटनांवर राज्य सरकारला वस्तूस्थितीची जाणीव करून देणे आवश्यक आहे. या घटनांमुळे महाराष्ट्रात अस्वस्थता पसरली असून या संदर्भात गंभीर विचारमंथन व तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. या घटनांकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष घालावे व संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, असेही ते म्हणाले.
निष्पाप सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू होईपर्यंत त्याला मारहाण करणे ही गंभीर बाब आहे. तसेच बीडमधील घटनाही गंभीर आहे. त्यामुळे मला वाटलं की आपण परभणी आणि बीड येथे जावं आणि प्रत्यक्ष माहिती घ्यावी, म्हणून मी आलो आहे, असे शरद पवार म्हणाले. या दोन्ही घडना फारच गंभीर असून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.
10 डिसेंबर रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली. त्यानंतर शहरात हिंसचारा उफाळला होता. त्यात सोमनाथ सूर्यवंशी याचा सहभाग नव्हता. विटंबनेनतर जी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून आली, त्याचप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी देखील सर्वांसोबत रस्त्यावर उतरला होता. निष्पाप सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू होईपर्यंत मारहाण करणे ही गंभीर बाब आहे. दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, असेही ते म्हणाले. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस राज्य सरकारकडे पाठपुरावा करेल. या प्रकरणाविषयी सरकारने जी माहिती दिली ती माहिती न पटणारी होती म्हणून मी प्रत्यक्ष भेटीला आलेलो आहे, असे ते म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List