निमित्त – अजब मैत्रीची गजब गोष्ट!

निमित्त – अजब मैत्रीची गजब गोष्ट!

>> आशीष निनगुरकर

ज्यांच्या मैत्रीने एकेकाळी मैदान मारलं ती जोडी म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी. नुकताच या दोघांच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला अन् हर्षोल्हास व विरहाचे दुःख काठोकाठ भरून वाहणारा क्षण आपण साऱयांनी अनुभवला

प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र हा खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या दृष्टीने मैत्रीला विशेष महत्त्व आहे. ज्यांच्या मैत्रीनं एकेकाळी मैदान मारलेलं ती जोडी म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची जोडी मैदानात असली की भल्याभल्या गोलंदाजांना घाम फुटायचा. दोघेही रमाकांत आचरेकर सरांचे शिष्य. पण नियतीच्या मनात काही वेगळं होतं. सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या मैदानात नावलौकिक मिळवत गेला. तर विनोद कांबळी वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत राहिला. पण दोघांची नाळ ही क्रिकेट आणि आचरेकर सरांच्या शिकवणीशी जुळून होती. नुकताच सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचा एका कार्यक्रमातील भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

3 डिसेंबर रोजी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी रमाकांत आचरेकर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला हजेरी लावली होती. या वेळी विनोद कांबळीही आले होते, विनोद कांबळी आज 52 वर्षांचे आहेत. मात्र त्यांची मानसिक आणि शारीरिक स्थिती पूर्णपणे फीट नसल्याचं म्हटलं जातं. तर झालं असं की, सचिन व्यासपीठावर चढताच त्याची पहिली नजर पडली ती आपल्या मित्राकडे. सचिनने क्षणाचाही विलंब न लावता विनोदकडे गेला आणि त्याची विचारपूस केली. विनोद कांबळीने सचिनचा हात हातात घेऊन घट्ट धरून ठेवला. एक भक्कम पार्टनरशिप केल्याचं भास करून दिला. आचरेकर सरांच्या स्मारकाच्या अनावरणानिमित्ताने हे दोन्ही जुने मित्र एका व्यासपीठावर आले होते. या वेळी विनोद सचिनचा हात सोडायला तयार नव्हता आणि त्याला तिथेच थांबण्यासाठी सांगत होता. व्हिडीओ नीट पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, विनोद कांबळी सचिनला मिठी मारण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र शारीरिक स्थिती व्यवस्थित नसल्यानं त्याला उठताही येत नव्हतं. हेच दृश्य पाहून नेटकरी भावूक झाले आहेत.

आजारी विनोद कांबळीही त्यांच्या तब्येतीच्या चिंतेनंतर पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या दिसले. सचिन आणि कांबळी या बालपणीच्या दोन मित्रांनीही सोहळ्यादरम्यान काही क्षण शेअर केले. 2019 मध्ये आचरेकर गुरुजींचे निधन झाले होते. आचरेकर यांनी भारतासाठी खेळलेल्या अनेक खेळाडूंना त्यांचे मार्गदर्शन दिले होते. तेंडुलकर आणि कांबळी यांच्यासह अनेक भारतीय क्रिकेटपटूंच्या कारकीर्दीला आकार देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हा कार्यक्रम त्यांच्या चिरंतन वारसाला श्रद्धांजली वाहणारा होता. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी दोघेही आचरेकर सरांचे आवडते शिष्य. सचिन उजवा आणि विनोद डावखुरा फलंदाज, परंतु दोघेही मुंबईकर आणि खेळात उजवे असल्याने लोकप्रिय आणि सर्वांचे आवडते. कार्यक्रमात सचिन तेंडुलकर यांनी आचरेकर सरांच्या  आठवणींना उजाळा दिला आणि अनेक किस्से सांगितले, सरांनी दिलेली शिकवण व संस्कार कोणताही न्यूनगंड मनात न ठेवता नवोदित खेळाडूंना बहाल करून सरांचे विचार त्यांच्या पश्चात जिवंत ठेवण्याचे काम करत एक अनोखी आदरांजली आपल्या गुरूंना वाहिली.

दिग्गजांच्या पंक्तीत बसण्याची कुवत असणाऱया विनोद कांबळी यांच्यासारखा खेळाडू स्वतवर आणि जडणाऱया वाईट सवयींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कमी पडला आणि आपण एका दिग्गज खेळाडूला मुकलो. लहान वयात क्रिकेटमध्ये विस्फोटक फलंदाजी करणारा विनोद कांबळी हा एकेकाळी सचिन तेंडुलकरपेक्षा देखील टॅलेंटेड मानला जायचा. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकावणारा फलंदाज म्हणून सुरुवात केलेल्या कांबळीच्या क्रिकेट करिअरचा अंतदेखील दुःखदायक होता. विनोद कांबळी याने सचिन तेंडुलकरप्रमाणेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी करून भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवलं होतं. वर्ष 1993 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना कांबळीने टेस्ट क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावलं तेव्हा तो केवळ 21 वर्षांचा होता. तर पुढील 17 टेस्ट सामन्यांत त्याने दोनदा द्विशतक ठोकलं होतं. विनोद त्याच्या क्षेत्रात स्वतच्या शहरातच नाही तर अख्ख्या देशात पहिल्या अकरामध्ये आला होता. फक्त एक दोन वेळा नाही तर तब्बल एकशे एकवीस वेळा.

या कार्यक्रमात विनोद कांबळीची ती रिअॅक्शन पाहिली, सचिनला पाहून किती मोठय़ाने ओरडला तो ‘अरे (माझा सखा..)’ जसा कितीतरी युगांच्या प्रवास प्रतीक्षेतून आपल्या मित्राची भेट व्हावी आणि आपण हर्षोल्हासित होत एकाच वेळी विरहाचे अपार दुःख काठोकाठ भरून वाहताना हा क्षण भयंकर होता. त्याच वेळी कडकडून मिठी मारायला उठत असताना, जवळ घेत असताना बाजूच्या व्यक्तीने अडवून ही भेट थांबवली. तो पाठमोरा होत असताना विनोद डोळे भरून त्याला पाहत होता. कदाचित तो पुन्हा कधी दिसणार नाही… किती मोठं अंतर पडलं मैत्रीत. कधीही भरून न येणारं न सांधणारं… कदाचित नियतीला हेच मान्य होतं.

काही इनिंग अपुऱयाच राहतात कायमच्या…मोठेपण का नको असतं माहितेय? मन जरठ बनत जातं, निब्बर बनत जातं. कधी आपण मित्राने चल म्हटलं की काय कशाला, कुठे असले फालतू प्रश्न डोक्यात न आणता सरळ चप्पल घालून बाहेर पडायचो. तासन्तास भटकत, समुद्र, रस्ते, मैदानं पालथी घालत दुनियेची चिंता करायचो, नाहीतर दुनियेला फाटय़ावर मारायचो. पण मित्रांबरोबर जे आयुष्य घालवलं ना… ती चमक परत कधी आलीच नाही चेहऱयावर. आता मित्र चल म्हणाले तर कशाला, कुठे असले प्रश्न हमखास आणणारं वय झालंय. सगळ्याच गोष्टींचा, माणसांचा कंटाळा येऊ लागलाय. अगदी मित्रांबरोबर बसलो तर मैत्रीला दृष्ट लागेल की काय. आपण जे आयुष्य जगलो ते खोटं होतं की काय, असं व्हायला नको ही भीती असते.

विनोदसाठी इतकंच म्हणावं वाटतं, सचिन नेहमीच तुझा तो मित्र राहिला आहे…!

तेरी हर एक बुराई पे डांटे वो दोस्त

ग़म की हो धूप तो साया बने तेरा वो दोस्त

नाचे भी वो तेरी खुशी में  तेरा वो दोस्त!

       z [email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शशांक केतकर दुसऱ्यांदा होणार बाबा; नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘गुड न्यूज’! शशांक केतकर दुसऱ्यांदा होणार बाबा; नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘गुड न्यूज’!
अभिनेता शशांक केतकरने 2025 या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. शशांक पुन्हा एकदा बाबा होणार आहे....
काय ते थर्ड क्लास…; ‘बिग बॉस’बद्दल प्रश्न विचारणाऱ्यावर भडकला गश्मीर महाजनी
एका मेसेजमुळे सुरु झाली होती प्रियांका-निकची प्रेमकहाणी; नात्याची सुरुवात फारच हटके, इंट्रेस्टींग लव्हस्टोरी
अनुराग कश्यपने बॉलिवूड इंडस्ट्रीची काढली अक्कल; घेतला मोठा निर्णय
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला हिंदुस्थानात आणणार, हस्तांतरण प्रक्रियेला वेग
गुलाबराव पाटलांच्या ड्रायव्हरनं हॉर्न वाजवला अन् मोठा राडा झाला; जळगावमधील पाळधीत दगडफेक, जाळपोळ आणि संचारबंदी
कौटुंबिक वाद विकोपाला गेला; सख्ख्या भावानंच काढला चार बहिणी आणि आईचा काटा