गरोदरपणात स्त्रिया कोणते व्यायाम करू शकतात? तज्ज्ञांकडून जाणून घ्या..
आपल्या शरीराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अनेक घरगुती उपाय तसेच व्यायाम नियमित करत असतो. व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त तर राहतेच पण आजारांपासून देखील दूर राहतो. व्यायाम केल्याने संपूर्ण शरीर सक्रिय राहते. लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. तर दुसरीकडे गरोदरपणात व्यायाम करायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जयपूरच्या कोकून हॉस्पिटलच्या वरिष्ठ सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अनुपमा गंगवाल सांगतात की, गरोदर महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत हिवाळ्यात व्यायाम करावा. व्यायाम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या जेणेकरून तुमच्या मुलावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. गरोदरपणात महिला कोणते व्यायाम करू शकतात हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
गरोदर महिलांनी चालणे फायदेशीर आहे
चालणे हे प्रत्येकासाठी उत्तम व्यायाम आहे. त्यात गरोदर महिलांसाठी चालणे हा एक चांगला व्यायामाचा पर्याय आहे कारण यामुळे शरीरात रक्ताभिसरण सुधारते. यामुळे हृदयाचे आरोग्यही सुधारते. हिवाळ्यात बाहेर फिरताना उबदार कपडे घालणे गरजेचे आहे. बाहेर खूप थंडी असेल तर घराच्या आत हलकी वॉक करता येते. याशिवाय प्रेग्नेंसी योगा गरोदर महिलांसाठीही फायदेशीर आहे, कारण यामुळे शारीरिक लवचिकता वाढते. व आरोग्य चांगले राहते.
हळूहळू स्क्वॅट्स करा
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, गरोदर महिलांसाठी स्क्वॅट्स हा देखील एक उत्तम व्यायामाचा प्रकार आहे. स्क्वॅट्स करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला सरळ उभे राहून हात समोरच्या बाजूला ठेवायचे आहेत. त्यानंतर पुन्हा पाठ ताठ ठेवून मागच्या बाजूला बसा. जसे की, तुम्ही खुर्चीवर बसेल आहात, तसे बसा. आणि हळूहळू खाली वाकवा, नंतर वरच्या दिशेने जा. हा व्यायाम अतिशय हळू हळू आणि काळजीपूर्वक करावा. गरोदर महिलांनी हे व्यायाम करताना आपल्या घरातील एखादी व्यक्ती सोबत असावी. जेणेकरून व्यायाम करताना कोणतीही अडचण येणार नाही.
या गोष्टी लक्षात ठेवा
ज्या महिलांना हिवाळ्यात चालण्यास त्रास होतो, त्यांच्यासाठी खुर्चीवर बसून व्यायाम करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे शरीर उबदार राहण्यास मदत होते. व्यायाम योग्य आणि हळूहळू करणे खूप महत्वाचे आहे. गरोदरपणात नेहमी आपल्या शारीरिक मर्यादा लक्षात ठेऊन व्यायामाचे प्रकार करा आणि काळजी घ्या आणि कोणताही व्यायाम करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या जेणेकरून तुमचे आणि तुमच्या बाळाचे आरोग्य सुरक्षित राहील.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List