मृत्यूनंतर नव्या नवरीप्रमाणे नटली ‘ही’ अभिनेत्री, अंत अत्यंत वाईट, तिची शेवटची इच्छा जाणून व्हाल थक्क
Actress Life: झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी प्रोफेशनल आयुष्यात यश मिळवलं. पण खासगी आयुष्याचा आनंद अभिनेत्रींना फार काळ घेता आला नाही. अशाच एका अभिनेत्री पैकी एक म्हणजे अभिनेत्री स्मिता पाटील… स्मिता पाटील हिने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं. पण अभिनेत्रीचा अंत फार वाईट होता. शिवाय सिनेमाच्या सेटवर स्मिता हिने शेवटची इच्छा व्यक्त केली होती.
स्मिता पाटील यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘आज की आवाज’ सिनेमात अभिनेता राज बब्बर यांच्यासोबत काम करत असताना दोघांमध्ये प्रेम बहरलं. पण तेव्हा राज बब्बर विवाहित होते. विवाहित असताना राज बब्बर यांनी स्मिता यांच्यासोबत लग्न करून एकत्र राहाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा राज यांच्या कुटुंबियांनी अभिनेत्याच्या निर्णयाचा विरोध केला.
पण कुटुंबाचा त्याग करत राज बब्बर यांनी 1986 मध्ये स्मिता पाटील हिच्यासोबत लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे. ज्याचं नाव प्रतिक बब्बर असं आहे. पण मुलाला जन्म देताच स्मिता पाटील यांचं निधन झालं. मुलाला जन्म दिल्यानंतर काही वेळाने स्मिताचा संसर्गामुळे मृत्यू झाला. वयाच्या 31 व्या वर्षी स्मिताने या जगाचा निरोप घेतला. वेळेवर उपचार न मिळाल्याने अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याचा आरोपही काही जणांनी केला आहे.
स्मिता पाटील हिची शेवटची इच्छा…
स्मिता पाटील हिने मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांच्याकडे शेवटची इच्छा व्यक्त केली होती. स्मिताची शेवटची इच्छा सांगताना दीपक म्हणाले, ‘स्मिता मला कायम म्हणायच्या माझं निधन झाल्यानंतर मला नव्या नवरी सारखं तयार कर…’
दीपक सावंत यांनी मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘एकदा स्मिता पाटील यांनी मला राज कपूर झोपलेले असताना मेकअप करताना पाहिलं होते. तेव्हा स्मिता मला म्हणाल्या होत्या माझा देखील असाच मेकअप कर. पण मी नकार दिला. म्हणालो मॅडम माझ्याकडून असं होणार नाही… एका मृत व्यक्तीचा मेकअप करत आहे… असं मला वाटेल…’
‘पण एक दिवस स्मिता झोपलेल्या असताना मला त्यांचा मेकअप करावा लागेल असं वाटलं देखील नव्हतं… स्मिता पाटील यांना मृत्यूनंतर नव्या नवरी सारखं नटवलं होतं. ‘ असं देखील मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत म्हणाले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List