केवायसीचा बहाणा करून घातला गंडा
केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली ठगाने तत्काळ कर्ज घेऊन विशेष महिला शिक्षिकेची फसवणूक केली. ठगाने पाच लाख रुपये कर्ज घेऊन 4 लाख 78 हजार रुपये खात्यातून काढून घेतले. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला.
तक्रारदार या विशेष शिक्षिका म्हणून ताडदेव येथील एका शाळेत कार्यरत आहेत. गेल्या महिन्यात त्याना एका नंबरवरून पह्न आला. पह्न करणाऱयाने त्याचे नाव सांगून तो बँकेचा प्रतिनिधी असल्याचे भासवले. बँक खात्याचे केवायसी अपडेट करावे लागेल, अन्यथा खाते बंद होईल असे तिला सांगितले. जर केवायसी अपडेट करायचे असल्यास तीन नंबरवर तिला पह्न करण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून महिलेने त्या नंबरवर पह्न केला. काही वेळाने महिलेच्या मोबाईलवर एक पह्न आला. ठगाने महिलेला ई-वॉलेट उघडण्यास सांगितले. त्यानंतर व्हॉट्सअॅपवर स्क्रीन शेअर करण्यास सांगितले. महिलेने स्क्रीन शेअर केली. स्क्रीन शेअर केल्यावर ठगाने महिलेला जन्मतारीख आणि ओटीपी शेअर करण्यास सांगितला.
महिलेने तो ओटीपी शेअर केला. सायंकाळी सुट्टी झाल्यावर ठगाने तिला पुन्हा पह्न केला. महिला लालबाग येथील एका एटीएममध्ये गेली. एटीएममधून तिने एका नंबरवर पह्न केला. ठगाने प्रोसिजरच्या नावाखाली कार्ड मशीनमध्ये टाकण्यास सांगितले. तो मोबाईल नंबर स्क्रीनवर टाकण्यास सांगितले. महिलेने तो नंबर स्क्रीनवर टाकला. त्यानंतर तिच्या खात्यातून पैसे गेले. पैसे गेल्यावर तिने ठगाला विचारणा केली. ते पैसे पुन्हा खात्यात जमा होणार असल्याचे त्याने भासवले. दुसऱया दिवशी संध्याकाळपर्यंत महिलेच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते. तेव्हा ठगाने कोणतेही व्यवहार करू नका अशा भूलथापा मारल्या. रात्री पैसे खात्यात जमा न झाल्याने तिच्या पतीने एन. एम. जोशी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर बँकेत जाऊन चौकशी केली तेव्हा तिच्या खात्यावरचा नंबर बदललेला होता. त्याऐवजी दुसरा नंबर होता. ठगाने नंबरची अदलाबदल करून तत्काळ 5 लाख रुपयाचे कर्ज घेतले. त्यातील 4 लाख 78 हजार रुपये ठगाने काढूनदेखील घेतले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List