पुणे महापालिका निवडणूकांची तयारी झाली सुरु,भाजपा लागली कामाला इतरांचे काय?

पुणे महापालिका निवडणूकांची तयारी झाली सुरु,भाजपा लागली कामाला इतरांचे काय?

एकीकडे विधानसभेत महायुतीतील भाजपाला मोठे यश मिळाल्याने आता पुणे महानगर पालिकेत पुन्हा सत्ता आणण्याची जोरदार तयारी एकीकडे भाजपाने सुरु केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाने स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरु केली आहे. गेली अडीच वर्षे पुणे महानगरपालिकेत प्रशासक असल्याने पुणेकरांच्या नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष झालेले आहे. भाजपाला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत १३२ हून अधिक जागा मिळाल्याने भाजपाचा आत्मविश्वासात वाढ झालेली आहे.

भाजपाने पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकाधिकार शाही मोडीत काढली असल्याने भाजपा आता आपला सर्वाधिक मतदार असलेल्या पुण्याच्या महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी कामाला लागले आहे. पुणे शहरातील विधानसभेत भाजपाने ५० हजार भाजप सदस्यांच्या नोंदणीचे लक्ष्य ठेवले आहे. तर शहरातील प्रत्येक प्रभागात दहा हजार भाजपाचे सदस्य नोंदणीचे लक्ष्य आहे. महापालिका निवडणूकीसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघात निरीक्षक नियुक्त केले जाणार आहेत. पुणे शहर भाजपा यासाठी लवकरच प्रभाग निहाय बैठका घेणार आहे.

महाविकास आघाडीत गोंधळ सुरुच

या संदर्भात भाजपाचे कसबा येथील आमदार हेमंत रासने यांनी प्रतिक्रीया दिलेली आहे. विधानसभा निवडणूकांच्या निकालानंतर भाजपाने महापालिका निवडणूकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांकडून कोणतीही तयार होताना दिसत नाही.महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला एकत्र सामोरे जायचे की स्वबळावर महापालिका निवडणूक लढवायची यावर महाविकास आघाडीत अजूनही एकमत होताना दिसत नाही असे भाजपा आमदार हेमंत रासने यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हटले आहे.

तर आम्ही स्वबळावर लढू

आमची स्वबळावर निवडणूका लढायची तयारी असली तरी महाविकास आघाडीत एकमेकांचा मान सन्मान राखला गेला पाहिजे, अन्यथा स्वबळावर निवडणूका लढण्याची तयारी आम्ही ठेवलेली आली आहे असे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.दुसरीकडे कॉंग्रेसने जर महाविकास आघाडीत पुणे महापालिका एकत्र लढविण्याचे ठरले नाही तर आम्ही देखील स्वतंत्रपणे लढण्याची तयारी ठेवल्याचे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी म्हटले आहे.

पुणे महापालिका पक्षीय बलाबल – 2017 

भाजप 99

काँग्रेस 09

राष्ट्रवादी 44

मनसे 2

सेना 9

एमआयएम 1

एकूण  सदस्यांची संख्या –  164

ठाकरे गट आणि मनसेचीही तयारी

दुसरीकडे उद्धव ठाकरे गट आणि मनसेकडून देखील महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे, राज ठाकरे स्वतः जातीने महापालिका निवडणुकीत पुण्याकडे लक्ष देणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या घोषणेच्या प्रतीक्षेत आहेत. आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक विधानसभा निवडणुकीपेक्षाही अधिक चुरशीची होणार यात शंका नाही असे म्हटले जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

31 डिसेंबरला शिर्डी साई मंदिर रात्रभर खुले 31 डिसेंबरला शिर्डी साई मंदिर रात्रभर खुले
नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबरला शिर्डीतील साईबाबांचे मंदिर रात्रभर उघडे ठेववण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. देशातील कोट्य़वधी भक्तांचे श्रद्धास्थान...
श्री विठ्ठल मंदिरातील पितळी दरवाजाला चांदीची झळाळी
राज्यातील मंदिरांमध्ये आठवडय़ातून एकदा होणार महाआरती; शिर्डीतील मंदिर न्याय परिषदेत ठराव
खंडाळ्यात खोळंबा; नाताळच्या सुट्टीचे ‘बारा’ वाजले
हिंगोली हादरले – एसआरपी जवानाचा कुटुंबावर बेछूट गोळीबार, पत्नीचा मृत्यू, चिमुकल्यासह दोघे गंभीर; आरोपी फरार
झेलेन्स्की म्हणाले, याहून अमानवी काहीच असू शकत नाही; ख्रिसमसच्या दिवशी रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला
‘इस्रो’ची धमाकेदार वर्षअखेर, स्पॅडेक्स 30 डिसेंबरला लाँच होणार