CIDCO : सिडकोच्या लॉटरीला भरघोस प्रतिसाद, एक लाख विक्रमी अर्ज, तुम्हालाही नशीब आजमावायचं असल्यास करा ‘या’ तारेखपर्यंत अर्ज

CIDCO : सिडकोच्या लॉटरीला भरघोस प्रतिसाद, एक लाख विक्रमी अर्ज, तुम्हालाही नशीब आजमावायचं असल्यास करा ‘या’ तारेखपर्यंत अर्ज

सिडकोच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या २६ हजार घरांच्या महागृहनिर्माण योजनेने १ लाख अर्जांचा विक्रमी टप्पा गाठला आहे. सुरुवातीपासूनच नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळालेल्या या योजनेने लोकप्रियतेचा उच्चांक गाठल्याचे हे द्योतक आहे. नागरिकांच्या विनंतीस मान देऊन या योजनेकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यासाठी २६ डिसेंबर २०२४ पर्यंत ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. अंतिम मुदत संपुष्टात येईपर्यंत नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद कायम राहणार असल्याचा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. तसेच एक लाख अर्जांचा टप्पा म्हणजे, सिडकोच्या गृहनिर्माण क्षेत्रातील योगदानाचा आणि विश्वसार्हतेचा जनतेने केलेला गौरव असल्याची प्रतिक्रियाही सिडकोने दिली आहे.

सिडकोतर्फे १२ ऑक्टोबर २०२४ रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या महागृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता. या योजनेंअंतर्गत २६,००० सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर (प), खारघर (पू) (तळोजा), मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये या सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेद्वारे सर्वसामान्य नागरिकांना नवी मुंबईमध्ये आपल्या हक्काचे आणि परवडणाऱ्या दरातील घर घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून परिपूर्ण पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी, दर्जेदार बांधकाम आणि नवी मुंबईतील समृद्ध जीवनशैली अनुभवण्याची संधी नागरिकांना या योजनेद्वारे लाभली आहे.

अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

अधिकाधिक नागरिकांना योजनेकरिता अर्ज करता यावा आणि अर्जदारांना आवश्यक त्या कागदपत्रांची जमवाजमव करता यावी याकरिता योजनेच्या अर्ज नोंदणीस २६ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच नोंदणी करताना बारकोड असलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आणि १०० किंवा ५०० रु. मूल्याच्या स्टॅम्पपेपरवर नोटरीकृत प्रतिज्ञापत्र सादर करण्याची अटही या पूर्वीच शिथील करण्यात आली आहे. यामुळे अधिकाधिक नागरिकांना सुरळीतपणे नोंदणी करता आली.

आता या योजनेची इकेवायसी नोंदणी २६ डिसेंबर २०२४ पर्यंत करता येईल. यासाठी सिडकोतर्फे cidcohomes.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. नोंदणी प्रक्रिया तथा योजनेविषयी अतिरिक्त माहिती प्राप्त करण्यासाठी ९९३०८७०००० हा संपर्क क्रमांक देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. सिडकोच्या अधिकृत समाजमाध्यमांवरून देखील वेळोवेळी सदर योजनेची अद्ययावत माहिती प्रसिद्ध केली जाते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी! शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या हत्येसाठी शार्प शूटर्सला सुपारी? लातूरमध्येच गेम करण्याचा प्लान; ठाण्यातून दोन जण ताब्यात मोठी बातमी! शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या हत्येसाठी शार्प शूटर्सला सुपारी? लातूरमध्येच गेम करण्याचा प्लान; ठाण्यातून दोन जण ताब्यात
मोठी बातमी समोर येत आहे, या बातमीनं खळबळ उडाली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे नेते आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा...
इस्लाम धर्म स्वीकारण्याचा सल्ला देणाऱ्याला पवित्रा पुनियाचं सडेतोड उत्तर; म्हणाली “सनातन धर्म..”
बॉक्स ऑफिसवर 25,000 कोटींचे कलेक्शन करणारा हा पहिलाच अभिनेता; सलमान,शाहरूखलाही मागे टाकलं
कायदा-सुव्यवस्थेशी तडजोड नाही..; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी घेतली कलाकारांची भेट
बद्धकोष्ठतेचे ‘हे’ गैरसमज दूर करा, उपाय जाणून घ्या
भाजपला 2244 कोटींची देणगी, ED ची धाड पडलेल्या कंपन्यांकडूनही निधी; निवडणूक आयोगाने उघड केली आकडेवारी
‘मी सिंगल आहे’, अर्जुन कपूरचं विधान, मलायका अरोराचा पलटवार, म्हणाली…