‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये ड्रेस कट करण्यासाठी आलेल्या प्रियंका हलदरवर लोक संतापले

‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये ड्रेस कट करण्यासाठी आलेल्या प्रियंका हलदरवर लोक संतापले

रैनाचा प्रसिद्ध यूट्यूब शो ‘इंडियाज गॉट लेटेंट सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये आलेली महिला स्पर्धक प्रियांका हलदरला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. या शोचे जज कॉमेडियन भारती सिंग, तिचा पती हर्ष लिंबाचिया आणि गायक टोनी कक्कर आहेत. या शोचा नियम असा आहे की स्पर्धकांनी त्यांची प्रतिभा दाखवण्याआधी स्वतःला 10 पैकी एक गुण द्यावा लागतो. त्यानंतर त्याने आपले टॅलेंट दाखवल्यानंतर, जर जजेसने दिलेले मार्क त्यांच्याशी जुळत असेल तर तो स्पर्धक हा शो जिंकेल आणि त्या दिवशी शोच्या तिकीट विक्रीतून आलेले सर्व पैसे त्याला दिले जातील. या शोमध्ये आलेली प्रियांका हलदर सध्या चर्चेत आहे. सध्या रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोचा 11वा भाग यूट्यूबवर नंबर दोन वर ट्रेंड करत आहे.

या शोमध्ये कॉस्च्युम कटर मोहम्मद आदिल देखील पोहोचला होता. तो त्याच्यासोबत त्याची मैत्रिण प्रियंका हलदरला घेऊन आला. त्यानंतर कॉस्च्युम कटर म्हणून आलेल्या मोहम्मद आदिलने मंचावर आपला परफॉर्मन्स दाखवायला सुरुवात केली. त्याने प्रियांकाचा ड्रेस अशा ठिकाणी कापला, जे पाहून न्यायाधीशांनाही आश्चर्य वाटले.

प्रियंका लाल बॉडीकॉन ड्रेसमध्ये आली होती. काही वेळात त्याने तिचा ड्रेस कट-आउटमध्ये बदलला. काही जज याने प्रभावित झाले पण काहींनी मोहम्मद आदिलचा खरपूस समाचार घेतला. त्याला त्याच्या प्रेयसीबद्दल प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, मुली त्याच्या आयुष्यात येतात पण त्या त्याची गर्लफ्रेंड बनू शकत नाहीत. यावर एका जजने गंमतीने म्हटले की, तुझं कपडे कापण्याचे कौशल्य पाहून त्या पळून गेल्या असतील. एका जजने सल्ला दिला की, तुम्ही दोघे गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड का बनत नाही? यावर आदिल म्हणाला की ते दोघे चांगले मित्र आहेत.

आत्तापर्यंत सगळं ठीक होतं, पण नंतर जेव्हा प्रियांकाने जे सांगितलं त्यानंतर सगळेच आश्चर्यचकीत झाले. तिने सांगितले की ती आधीच विवाहित आहे आणि तिला 15 वर्षांचा मुलगा आहे. तिचं हे म्हणणे ऐकून सगळेच हैराण झाले. सोशल मीडियावर या कृतीवर तिच्यावर जोरदार टीका केली आहे.


प्रेक्षक म्हणून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. कोणी म्हटलं हे बरोबर वाटलं नाही. एकाने म्हटलं की, मला तिच्या नवऱ्याबद्दल वाईट वाटतंय. एकजण म्हणाला – ती आई, पत्नी आणि मुलगी म्हणून अयशस्वी झाल्याचे दिसते. एक जण म्हणाला, मला तिच्या 15 वर्षाच्या मुलासाठी वाईट वाटतंय.

प्रियांका हलदर ही 33 वर्षांची आहे. तिला 15 वर्षांचा मुलगाही आहे. तिने क्राइम पेट्रोलमध्ये आणि ALTT वरील ‘उठा पता 4’ शोमध्ये देखील काम केले आहे. तिचे इंस्टाग्रामवर 14,500 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sanjay Raut : तुम्ही अर्बन नक्षलवाद्यांचे कमांडर, अजित पवार, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या; संजय राऊत संतापले Sanjay Raut : तुम्ही अर्बन नक्षलवाद्यांचे कमांडर, अजित पवार, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या; संजय राऊत संतापले
बीड जिल्ह्यातील राजकीय गुन्हेगारीवर खासदार संजय राऊत यांनी आसूड ओढला. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि बंदुक परवाने,...
युट्यूबर रणवीर अलाहाबादिया गर्लफ्रेंडसोबत गोव्याच्या समुद्रात बुडता बुडता वाचला; IPS अधिकाऱ्याने वाचवले प्राण
सोनू सूदला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर; पण ‘या’ भीतीमुळे नाकारली संधी
वर्षाचा बंपर क्लायमॅक्स; ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत मोठा ट्विस्ट
उड्डाणपुलांच्या मलमपट्टीसाठी महापालिकेकडे पैशांची वानवा !
भाजपच्या माजी आमदारावर फेकली अंडी; अज्ञातांविरोधात गुन्हा
जपान एअरलाईन्सवर सायबर अटॅक, तिकीटांची विक्री थांबवली