17 कोटी मोजा अन् ट्रम्पसोबत डिनर करा
अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यासोबत डिनर करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मात्र त्यासाठी तब्बल 17 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.
डिनरचे खास आयोजन ट्रम्प वेन्स उद्घाटन समितीद्वारे करण्यात आलेय. ज्या व्यक्ती एक मिलियन डॉलर दान करतील किंवा 2 मिलियन डॉलरपर्यंत रक्कम देतील, त्यांना 19 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष डिनरमध्ये सहभागी होता येईल. कॅबिनेट सदस्यांसोबत रिसेप्शन, उपराष्ट्रपती जेंडी वेन्स आणि त्यांच्या पत्नी उषा वेन्स यांच्यासोबत डिनरही करता येईल. याशिवाय 20 जानेवारी रोजी होणाऱ्यां ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याची सहा विशेष तिकिटेही मिळतील.
खासगी देणगी देणाऱ्यांना संधी
50 हजार डॉलर ते 10 लाख डॉलरपर्यंत खासगी देणगी देणाऱ्यांना उद्घाटन सोहळ्याच्या रात्री स्टारलाईट बॉलमध्ये सहभाग घेता येईल. अशा पद्धतीने देणगी घेणे हे अमेरिकेच्या उद्घाटन परंपरेचा भाग आहे. करदात्यांचे पैसे शपथविधी आणि अन्य अधिकृत कार्यक्रमांसाठी वापरले जातात. खासगी देणग्यांमधून परेड, संगीत आणि बॉलसारख्या कार्यक्रमांचे आयोजन होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List