एसटीच्या तिजोरीत एक हजार कोटींचा महसूल जमा होऊनही कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत

एसटीच्या तिजोरीत एक हजार कोटींचा महसूल जमा होऊनही कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत

एसटीला दरमहा 850ते 900 कोटी रुपये महसूल मिळतो; परंतु यंदा दिवाळीमुळे एसटीच्या तिजोरीत एक हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झालेला आहे. पण तरीही एसटी कर्मचारी अजूनही वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. एक हजार कोटी रुपये इतका चांगला महसूल मिळालेला आहे; पण तरीही एसटी कर्मचाऱयांना अद्याप वेतनाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

एसटी कर्मचाऱयांना किमान सात तारीखपर्यंत वेतन मिळणे आवश्यक आहे. पण नेहमी दहा तारखेला कधीच वेतन मिळत नाही. पगाराची तारीख दर महिन्याला उलटून जाते. या महिन्याची दहा तारीखही उलटून गेली आहे, पण पगार हातात आलेला नाही. पगाराची तारीख उलटून गेल्यावर कर्मचारी आरडाओरडा करतात, मग पगार होतो. हे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचा एसटी कर्मचाऱयांचा अनुभव आहे.

एसटीचे प्रवासी, महिला,ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी, स्वातंत्र्यसैनिक अशा विविध घटकांना प्रवासी भाडय़ात सवलत मिळते. 700 कोटी रुपये इतकी सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम एसटीला सरकारकडून मिळावी असा प्रस्ताव एसटीने गेल्या काही दिवसांपूर्वी पाठवला आहे. शपथविधी सोहळा, विधिमंडळ अधिवेशन, मंत्रिमंडळ विस्तारामुळे निर्माण झालेला महायुतीतील पेच यामुळे प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी महायुती सरकारला वेळ मिळत नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने विविध योजना-सवलती समाजातील विविध घटकांना दिल्या; पण सणवार, ऊन-वारा आणि पाऊस याची तमा न बाळगता रात्रंदिन प्रवाशांची वाहतूक करणाऱया एसटी कर्मचाऱयांचा सरकारला विसर पडला आहे हे दुर्दैवी असून, एसटी कर्मचाऱयांबाबत सरकारचा दृष्टिकोन नेहमी दुटप्पी राहिला आहे. राज्य सरकारकडून सावत्र भावाची वागणूक मिळत असल्याची भावना कर्मचाऱयांमध्ये निर्माण झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. सरकारही स्थापन झाले, पण निवडणुकीनंतर सरकारला एसटी कर्मचाऱयांचा लगेच विसर पडल्याची टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वाशीच्या एपीएमसी मार्केटजवळ भीषण आग; आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न वाशीच्या एपीएमसी मार्केटजवळ भीषण आग; आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
नवी मुंबईतील वाशीच्या एपीएमसी मार्केटजवळील परिसरात भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले...
चिमुकल्याच्या अंगावरून गाडी गेली तरी बचावला, चालक फरार
एन श्रीनिवासन यांचा इंडिया सिमेंटच्या सीईओ पदावरून राजीनामा, पत्नी आणि मुलीनेही सोडली कंपनी
संध्या थिएटच्या चेंगराचेंगरीतील मृत महिलेच्या कुटुंबाला अल्लू अर्जुन अन् चित्रपट निर्मात्यांकडून 2 कोटींची मदत
हिवाळ्यात रिकाम्या पोटी किती पाणी पिणे आवश्यक? जाणून घ्या तज्ञांकडून पाणी पिण्याची योग्य पद्धत
घरच्या घरी सोप्या पद्धतीनं बनवा मार्केटपेक्षा चविष्ट आणि हेल्दी टोमॅटो सॉस…रेसीपी नक्की वाचा
विठ्ठल मंदिराचा दरवाजा चांदीने झळाळणार, भक्ताकडून 30 किलो चांदी दान