संपूर्ण महाराष्ट्र अदानीला गिळता यावा म्हणून गैरमार्गानं सत्ता स्थापन केली! फडणवीस-अदानी भेटीवर संजय राऊत यांचा निशाणा

संपूर्ण महाराष्ट्र अदानीला गिळता यावा म्हणून गैरमार्गानं सत्ता स्थापन केली! फडणवीस-अदानी भेटीवर संजय राऊत यांचा निशाणा

उद्योगपती गौतम अदानी यांनी मंगळवारी ‘सागर’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दोघांमध्ये बंद दाराआड दीड तास चर्चा झाली. दुसरीकडे लॉरी असोसिएशनच्या मागण्या धुडकावून लावत अदानी ग्रुपचा कागल येथील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नवीन वादग्रस्त सीमा तपासणी नाका पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आला. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी परखड प्रतिक्रिया दिली. संपूर्ण महाराष्ट्र अदानीला गिळता यावा म्हणून गैरमार्गानं सत्ता स्थापन केली, असा हल्लाबोल राऊत यांनी केला. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

संपूर्ण महाराष्ट्र अदानीच्या घशात घालण्यासाठीच राज्यातील सरकार गैरमार्गाने विजयी करण्यात आले. जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस, मोठा उद्योगपती, मोदींचा मित्र याला महाराष्ट्रातले टोलनाकेही चालवायचे आहेत. जकातनाके, विमानतळे, भाजीची दुकाने, मार्केट कमिटी, संसद, सरकारही हेच चालवणार. म्हणजे कोणत्या स्तरापर्यंत ओरबाडणे सुरू झाले बघा, अशी टीका राऊत यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी अदानी भेटले. त्यानंतरच आमच्या लक्षात आले की महाराष्ट्राचा लचका तुटला जातोय आणि तो जकातनाक्याच्या रुपाने आम्ही पाहतोय. जकातनाके हे अदानीलाच का? कुणाच्या दबावाखाली आपण काम करताय? असा सवाल तर अदानीला हा सगळा महाराष्ट्र गिळता यावा म्हणून तुम्ही गैरमार्गाने सत्ता स्थापन केली, असा आरोप राऊत यांनी केला.

महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल लागून 20 दिवस झाले तरी अद्याप नवीन सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. गृहखाते कुणाकडे हे देखील ठरत नसेल तर राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. बीड जिल्ह्यातील केजमधील सरपंच संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या हत्या झाली. अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला. त्यांनतर पुण्यामध्ये आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे मॉर्निंग वॉकला गेले असताना अपहरण करण्यात आले आणि नंतर त्यांचा मृतदेह सापडला. भाजपचे अनेक पडलेले आमदार उचलून आणू, बारा वाजवू, अमूक करू अशा धमक्या देत असून त्यांची भाषा गुंडांना सुद्धा शरमने मान खाली घालणारी आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.

दरम्यान, महाविकास आघाडीचे खासदार महायुतीच्या संपर्कात असल्याच्या प्रश्नावर राऊत म्हणाले की, भाजपकडे पैसा, यंत्रणा असल्याने ते कोणतेही ऑपरेशन करू शकतात. दहशत निर्माण करून याआधीही त्यांनी माणसे फोडली आहेत. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार हे भितीपोटीच पळून गेले. ते काही ऑपरेशन लोटस नव्हते, तर ऑपरेशन डर होते. भिती दाखवायची, पळवायचे आणि तिथे गेल्यावर खटले मागे घ्यायचे, जप्त केलेली संपत्ती परत करायची हे यांचे धंदे आहेत. भाजपच्या सत्तेत नैतिकता नावाचा कोणताही प्रकार दिसत नाही, असेही राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

31 डिसेंबरला शिर्डी साई मंदिर रात्रभर खुले 31 डिसेंबरला शिर्डी साई मंदिर रात्रभर खुले
नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबरला शिर्डीतील साईबाबांचे मंदिर रात्रभर उघडे ठेववण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. देशातील कोट्य़वधी भक्तांचे श्रद्धास्थान...
श्री विठ्ठल मंदिरातील पितळी दरवाजाला चांदीची झळाळी
राज्यातील मंदिरांमध्ये आठवडय़ातून एकदा होणार महाआरती; शिर्डीतील मंदिर न्याय परिषदेत ठराव
खंडाळ्यात खोळंबा; नाताळच्या सुट्टीचे ‘बारा’ वाजले
हिंगोली हादरले – एसआरपी जवानाचा कुटुंबावर बेछूट गोळीबार, पत्नीचा मृत्यू, चिमुकल्यासह दोघे गंभीर; आरोपी फरार
झेलेन्स्की म्हणाले, याहून अमानवी काहीच असू शकत नाही; ख्रिसमसच्या दिवशी रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला
‘इस्रो’ची धमाकेदार वर्षअखेर, स्पॅडेक्स 30 डिसेंबरला लाँच होणार