मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट, बॉर्डर गावस्कर ट्राफी खेळणार नाही
सय्यद मुश्ताक अली करंडकमध्ये बुधवारी होणारी बंगालविरुद्ध बडोदा सामन्यावर सर्वांची नजर आहे. मोहम्मद शमी या सामन्यात खेळताना दिसणार आहे. शमीची नुकतीच बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेस चाचणी पार पडली. फिटनेस चाचणी पार पडल्यानंतर सांगण्यात आले की, मोहम्मद शमीला टीम इंडियामध्ये पुनरागम करण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे मोहम्मद शमीची बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी ऑस्ट्रेलियाला जाण्याची शक्यता धुसर झाली आहे.
द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मोहम्मद शमी याची बंगळुरु येथे नुकतीच फिटनेसची चाचणी झाली. दरम्यान, क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालकडून शमी सध्या तरी ऑस्ट्रेलियाला जाणार नाही असे सांगण्यात आले आहे. यानुसार बीसीसीआयला कदाचित शमी जास्त वेळ गोलंदाजी करू शकत नाही याची चिंता सतावू लागली आहे. त्यामुळे या वेगवान गोलंदाजावर वैद्यकीय पथक सतत लक्ष ठेवून आहे. शिवाय कर्णधार रोहित शर्मानेही त्याच्या तब्येतीबाबत ॲडलेड कसोटी संपल्यानंतर चिंता व्यक्त केली होती. तो म्हणाला की, मोहम्मद शमीसाठी पुनरागमनाचे दरवाजे खुले आहेत, मात्र त्याच्या गुडघ्याला पुन्हा सूज आली आहे. अशा परिस्थितीत शमीसाठी जास्त वेळ गोलंदाजी करणे सोपे जाणार नाही. संघ व्यवस्थापनाला घाईघाईने निर्णय घेत शमीची तब्येत आणखी बिघडवायची नाही, असेही तो म्हणाला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List