अखेर इस्रायलच्या पंतप्रधानांची भ्रष्टाचार प्रकरणात साक्ष
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांवर साक्ष देण्यासाठी प्रथमच न्यायालयात हजेरी लावली. त्यांच्यावर फसवणूक, विश्वासघात आणि लाचखोरीचे आरोप आहेत. गाझा युद्ध आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी कारवाईला विलंब करण्याची मागणी केली होती. युद्धातील अपराधी म्हणून त्यांना अटक वॉरंट बजावण्यात आल्यानंतर त्यांनी भ्रष्टाचार प्रकरणात साक्ष दिली. वारंवार कारणे देऊन नेतन्याहू यांनी न्यायालयात हजेरी लावण्यास नकार दिला. मात्र, न्यायालयाने मंगळवारी पुन्हा सुनावणी करण्याचा आदेश दिला होता. नेतन्याहू यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List