Sanjay Dutt : इंडस्ट्रीत येऊ नको असा संजय दत्तने ऐश्वर्या रायला सल्ला का दिलेला?
ऐश्वर्या रायची संजय दत्त बरोबर पहिली भेट एका मॅगजीनच्या फोटोशूट दरम्यान झाली. त्यावेळी ती अभिनेत्री नव्हती. पण ऐश्वर्या रायला पाहून संजय दत्त तिच्या सौंदर्याच कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नव्हता.
एका जुन्या इंटरव्यूमध्ये संजय दत्त ऐश्वर्यासोबत आपल्या पहिल्या भेटीबद्दल बोलला होता. ऐश्वर्याला पाहून संजय दत्त बोललेला की, ही सुंदर मुलगी कोण आहे?
संजय दत्तने त्यावेळी ऐश्वर्या रायला सल्ला दिलेला. तिने आपलं मॉडलिंगच करिअर पुढे न्यावं. फिल्म इंडस्ट्रीपासून लांब रहावं. रिपोर्ट्सनुसार ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरचा साधेपणा, निष्पापभावांनी संजय दत्तच मन जिंकलं होतं. त्याने ऐश्वर्याला रायला सांगितलेलं की, तू चित्रपट सृष्टीपासून लांब रहा. कारण हे क्षेत्र तुला बदलून टाकेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List