काय सांगता ? फास्ट फूड खाल्ल्याने लवकर म्हातारपण येतं ?
आजच्या काळामध्ये तरुणांसोबत सर्वच वयोगटातील लोक हे फास्ट फूड खाणे पसंत करतात. चिप्स, बिस्किट, बर्गर, सॉफ्ट ड्रिंक आणि इन्स्टंट नूडल्स हे सर्व अल्ट्रा प्रोसेस फूड आहे. अल्ट्रा प्रोसेस फुड्सचे आरोग्यावर अनेक वाईट परिणाम होतात. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार असे समजले आहे की अल्ट्रा प्रोसेड फूडचे जास्त सेवन केल्यामुळे तुमचे वय झपाट्याने वाढते. याचा अर्थ असा की वयाच्या 40 व्या वर्षी तुम्ही 55 वर्ष वयाचे दिसायला लागतात. ऑस्ट्रेलियातील एका विद्यापीठातील संशोधकांनी नुकतेच एक वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार जे लोक संतुलित आहाराचे सेवन करतात त्यांचे वय आहे त्या वयापेक्षा कमी दिसते. त्यासोबतच जे लोक जास्त प्रमाणात फास्टफूडचे सेवन करतात त्यांचे वय आहे त्या वयापेक्षा जास्त दिसते.
एज अँड एजिंगमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार 20 ते 79 वर्ष वयोगटातील 16,055 व्यक्तींवर संशोधन केले गेले. या संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की अल्ट्रा प्रोसेस फूड चे सेवन करणारे व्यक्तींचे जैविक वय हे संतुलित आहार सेवन करणाऱ्या व्यक्ती पेक्षा 2.4 महिन्याने वाढलेले होते.
काय आहे जैविक वय?
व्यक्तीचे जैविक वय हे त्याचे आरोग्य आणि जीवनशैलीच्या आधारावर ठरवले जाते. योग्य जीवन शैलीचा अवलंब केल्याने जैविक वय कमी होऊ शकते. तर चुकीच्या जीवनशैलीचा अवलंब केल्याने आणि फास्ट फूड सारखे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने जैविक वय वेगाने वाढू शकते.
अल्ट्रा प्रोसेस फूड खाण्याचे दुष्परिणाम
अल्ट्रा प्रोसेस फूड म्हणजे जे कंपनीमध्ये तयार केले जाते. या पदार्थांमध्ये हायड्रोजनेटेड तेल, उच्च फ्रक्टोज कॉर्न सिरप, चव वाढवणारे आणि इमल्सीफायर्स सारखे घटक असतात. हे पदार्थ दीर्घकाळापर्यंत खराब न होऊ देण्यासाठी वापरले जातात. जे आरोग्यासाठी हानिकारक आहेत.
हा धोका कसा टाळायचा?
हा धोका टाळण्यासाठी संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. यासोबतच ताजे आणि कमी प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे. घरगुती अन्न हे पौष्टिकतेने समृद्ध असतं. हे वाढत्या वयावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात. जर तुम्हाला वयाच्या तिसाव्या वर्षी 55 वर्षांचे दिसायचं नसेल तर तुम्हाला फास्टफूड खाणे टाळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला आत्तापासूनच तुमच्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List