हिवाळ्यात 25 टक्क्यांनी वाढतो हृदयविकाराचा धोका, कशी घ्याल काळजी?
हिवाळा हा ऋतू आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. या दिवसात अनेक पौष्टिक गोष्टींचे सेवन केल्या जाते त्यामुळे आरोग्याला त्याचा फायदा होतो. मात्र हिवाळ्यामध्ये तापमान कमी झालेले असते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका 25 टक्क्याने वाढतो असे समोर आले आहे. हिवाळ्यामध्ये कमी तापमान असते त्यामुळे हृदयाच्या नसांमध्ये आकुंचन होते. त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयविकाराचा झटका येतो. मेडिकल जर्नल द लैंसेटच्या संशोधनानुसार उन्हाळ्याच्या तुलनेमध्ये हिवाळ्यात हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. यामुळे हिवाळ्यात हृदयाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. हिवाळ्यामध्ये हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी काय करावे ते जाणून घेऊ.
तज्ञांच्या म्हणण्यानुसार हिवाळ्यात हवा थंड असते. थंड हवेचा श्वास घेतल्याने हृदयाच्या नसांमध्ये उबळ येऊ शकते यामुळे ह्रदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली वर दबाव पडतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. पारस हॉस्पिटल गुरुग्राम येथे कार्डिओलॉजी विभागाचे युनिट हेड डॉक्टर अमित भूषण शर्मा सांगतात की थंड हवामानामुळे रक्तदाब वाढतो. हिवाळ्यामध्ये हृदयविकाराच्या समस्या ही वाढता. या वेळेत आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?
हिवाळ्यात आहाराची विशेष काळजी घ्या. हिवाळ्यामध्ये मिळणारी फळे, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात मोठ्या प्रमाणात समावेश करा. त्यासोबतच बाहेरचे फास्ट फूड आणि जास्त गोड पदार्थ खाणे टाळा. हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी शरीर उबदार ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. शरीर उबदार ठेवण्यासाठी उबदार कपडे घाला आणि अचानक जड व्यायाम करू नका. बाहेर व्यायाम करण्याऐवजी घरातच हलका व्यायाम करा.
रक्तदाब तपासा
हिवाळ्यामध्ये रक्तदाब तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. रक्तदाब वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर तुम्हाला आधीच हृदयविकार असेल तर तुमची औषधे वेळेवर घ्या. छातीत वारंवार दुखणे, अस्वस्थता किंवा श्वास घेण्यास त्रास होणे अशी हृदयविकाराशी संबंधित कोणतेही लक्षण आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क करा. याबाबतीत अजिबात गाफील राहू नका.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List