दररोज चावून खा ही पाने आणि हे तीन आजार कायमचे दूर पळवा
शरीरात कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढली तर अनेक आरोग्यास हानिकारक समस्या निर्माण होतात. एकदा कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढली तर तिला कंट्रोल करणे कठीण असते. आयुर्वेदिक तज्ज्ञ आचार्य बालकृष्ण यांनी याबाबत एक नैसर्गिक उपाय सांगितलेला आहे. आचार्य बालकृष्ण यांच्या मते कडूनिंबाची पाने चावून खाल्ल्याने कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात करता येऊ शकतो. चला तर पाहूयात आयुर्वेदिक तज्ज्ञांनी कॉलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी कडूनिंबाची पाने चावून खाण्याचे काय फायदे असतात ?
कडूनिंबाच्या पानात औषधीय गुणधर्म असतात. यातील एंटीऑक्सीडेंट आणि एंटी इंफ्लेमेटरी गुण कॉलेस्ट्रॉल आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. कडूनिंबाचा पाला पाहीला तरी त्यांची कडवडपणामुळे अनेक जण नाक मुरडत असतात. कडूनिंबाच्या पानांचा स्वाद जरी कडू असला तरी त्याचे गुणधर्म अत्यंत औषधी आहेत. कडूनिंबाची पाने अनेक आजारांवर रामबाण उपचार आहेत.
कडूनिंब बॅड कॉलेस्ट्रॉलला कमी करते –
कडूनिंबाच्या पानांमध्ये आढळणारी काही संयुगे बॅड कॉलेस्ट्रॉलची ( LDL ) पातळी कमी करतात आणि रक्त प्रवाह सुधारतात. त्यामुळे हृदयविकाराची शक्यता कमी होते.
गुड कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवते –
कडुनिंबाच्या नियमित सेवनाने आपल्या शरीरातील चांगल्या कॉलेस्ट्रॉलची पातळी ( HDL ) वाढवते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले रहाते.
कडूनिंबाच्या पानांचे फायदे –
- कडूनिंबाच्या पानांचे सेवन केल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये रहाते. जे कॉलेस्ट्रॉलची पातळी स्थिर राखण्यासाठी मदत करत असते.
- ही कडुनिंबाची पाने चावून खाल्ल्याने शरीरात फ्री रेडिकल्सला कमी करते. त्यामुळे हृदयाचा धमन्यांचे आरोग्य चांगले राहाते. तसेच रक्तवाहीन्यातील चरबी हटविण्यास मदत करते.
- यात एंटी – इंफ्लेमेटरी गुण असतात. त्यामुळे नसांमध्ये सुज आणि रक्तांच्या गुठळ्या होण्याचा धोका कमी होतो.
कडूनिंबाच्या पानांचा कसा वापर करावा ?
काढा – कडूनिंबाच्या पानांना उकळून त्याचा काढा बनवावा आणि सकाळी रिकाम्या पोटी तो प्राशन करावा
कडूनिंबाची पावडर – कडुनिंबाच्या पानांना वाळवून त्याची पावडर तयार करावी आणि पाण्यासोबत घ्यावी
कडूनिंबाचा चहा – कडू निंबाचा चहा दिवसातून एकदा प्यायल्याने कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहाते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List