हिमाचलमध्ये भीषण बस दुर्घटना, 25 प्रवाशांनी भरलेली बस 200 फुट दरीत कोसळली; चालकाचा मृत्यू

हिमाचलमध्ये भीषण बस दुर्घटना, 25 प्रवाशांनी भरलेली बस 200 फुट दरीत कोसळली; चालकाचा मृत्यू

हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील आनी परिसरात भीषण दुर्घटना घडली आहे. अनी येथील शकेलहारजवळ येथे एक खासगी बस खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये चालकाचा मृत्यू झाला असून बसचा चक्काचूरा झाला आहे . 25 प्रवाशांनी भरलेली बस 200 फुट खोल दरीत कोसळल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून या अपघातात नेमका किती जणांचा मृत्यू झाला याची आकडेवारी समजू शकलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कुल्लू येथील आनी उपमंडलच्या श्वाड नगान रोडजवळ या बसचा अपघात झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बसमधील 20 ते 25 प्रवासी करसोग येथून आनी येथे परतत होते. मात्र मध्येच अपघात झाला. या अपघातात बसचा चक्काचुरा झाला. अनेक जखमी प्रवासी बसच्या आजुबाजूला दिसत आहेत. स्थानिकांचे बचावकार्य सुरु आहे. या घटनेनंतर बसचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. ही बस रोडपासून थेट 200 फूट खोल दरीत कोसळली. स्थानिकांनी आपल्या खाजगी वाहनातून जखमींना रुग्णालयात नेले. भरधाव बसचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस सरळ खाली जाऊन चक्काचूर झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या अपघातानंतरचा एक व्हिडिओही समोर आला आहे. बस दरीत पडल्यानंतर शर्थीच्या प्रयत्नांनी स्थानिकांनी बसमधून प्रवास करणाऱ्या लोकांना बाहेर काढले. काही जखमींनी स्वतः बाहेर पडण्याचा प्रयत्नही केला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, अचानक त्यांना मोठा आवाज ऐकू आला. बस खड्ड्यात पडल्याचे दिसले. आतून किंचाळण्याचे आवाज ऐकू आले.त्यानंतर स्थानिक आवाजाच्या दिशेने तातडीने मदतीसाठी धावले. अपघाताची माहिती पोलिसांनाही कळवण्यात आली. सध्या जखमींना रुग्णालयात नेण्याचे काम सुरू आहे. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे.  अपघाताचे नेमके कारण कळलेले नाही. या दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला, याची नेमकी माहिती सध्या उपलब्ध नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये अक्षराकडे ‘गुड न्यूज’; काय असेल अधिपतीची प्रतिक्रिया? ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये अक्षराकडे ‘गुड न्यूज’; काय असेल अधिपतीची प्रतिक्रिया?
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकविन चांगलाच धडा’ या मालिकेत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. अक्षराच्या आयुष्यात अनपेक्षित वळण येतंय. घर...
“सांताक्लॉजला पत्र लिहून सांगेन की..”; ख्रिसमसनिमित्त लीला, शिवा, पारूने सांगितल्या आपल्या इच्छा
‘फक्त वर्षभर डेटिंग अन् त्यानंतर..’; पत्नी शुरासाठी अरबाज खानची खास पोस्ट
पतीच्या संमतीशिवाय माहेरच्यांना घरात ठेवणे ही ‘क्रूरताच’, कोलकाता हायकोर्टाचा निर्वाळा
Mumbai crime news – पोलिसांनी चार तासांत वाचवले 4.65 कोटी रुपये
पालकमंत्री पदावरून गोगावले-तटकरेंत बॅनरवॉर
शीव कोळीवाड्यातील इमारतींचा पुनर्विकास पुन्हा लांबणीवर; निविदा प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती