लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? महिलांना पडला प्रश्न
सत्तेवर आल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम दरमहा 2100 रुपये करू असे आश्वासन महायुतीने दिले होते, मात्र हे आश्वासन पूर्ण करण्याबाबत महायुतीत उदासिनता दिसत आहे. त्यात लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा होत आहे. त्यातच आता या योजनेचा डिसेंबरचा हप्ता अजून मिळालेला नसल्याने राज्यातील महिलांना आता पुढे पैसे मिळणार की नाही असा प्रश्न पडला आहे.
राज्यात विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून 17 दिवस उलटले. या निकालानंतर तब्बल 12 दिवसांनी महायुतीने सरकार स्थापन केले. देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधी होऊन पाच दिवस झाले तरी अद्याप सरकार कामाला लागलेले दिसत नाही. त्यात अद्याप मंत्रीमंडळ विस्तार देखील झालेला नाही.
डिसेंबर महिना उजाडला मात्र राज्यात लाडक्या बहिण योजनेचा डिसेंबरचा हप्ता अद्याप बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही. राज्यात महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिण योजनेची रक्कम वाढवून 2100 रुपये करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेत आल्यानंतर आता ही रक्कम सुरू करण्याबाबत महायुतीमध्ये उदासिनता दिसत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार कधी असा प्रश्न पडला आहे. तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी येत्या तीन चार दिवसात हा हप्ता मिळणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.
2100 रुपयांसाठी पुढच्या भाऊबीजेची प्रतीक्षा करावी लागणार
सत्तेवर आल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम दरमहा 2100 रुपये करू असे आश्वासन महायुतीने दिले होते, परंतु आता त्याबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. लाडकी बहिण ही योजना भाऊबीजेला सुरू करण्यात आली होती त्यामुळे 1500 चे 2100 रुपये पुढच्या भाऊबीजेपासूनच देता येतील असे विधान काही दिवसांपूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List