RBI गव्हर्नरला किती मिळतो पगार आणि काय मिळतात सुविधा? जाणून घ्या

RBI गव्हर्नरला किती मिळतो पगार आणि काय मिळतात सुविधा? जाणून घ्या

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने संजय मल्होत्रा यांची नवे गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. आता ते शक्तीकांत दास यांची जागा घेतील. ते राजस्थान केडरचे 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. संजय मल्होत्रा 11 डिसेंबर 2025 रोजी नवीन गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारतील.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आयआयटी-कानपूरमधून शिक्षण पूर्ण केले आहे. याशिवाय त्यांनी अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठातून सार्वजनिक धोरणात पदव्युत्तर पदवीही मिळवली आहे. त्यांनी महसूल सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. तर त्यांनी आरईसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदही भूषवले आहे.

किती मिळतो पगार?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरच्या पगाराबद्दल बोलायचे तर नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांना अडीच लाख रुपये पगार मिळणार आहे. हा पगार देशाच्या पंतप्रधानांच्या पगारापेक्षा जास्त आहे. पगाराव्यतिरिक्त, आरबीआय गव्हर्नरला राहण्यासाठी घर तसेच केंद्र सरकारकडून कार आणि ड्रायव्हर, गृहोपयोगी आणि इतर अनेक सुविधा मिळतात.

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​सध्या अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून काम पाहत आहेत. तर याआधी ते वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागात सचिव होते. संजय मल्होत्रा ​​यांना इकॉनॉमिक ॲडमिनिस्ट्रेशन, पब्लिक फायनान्स आणि एनर्जी रिफॉर्म या विषयांची चांगली जाण आहे. महसूल विभागातही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

…अन् एकनाथ शिंदे विनोद कांबळीच्या मदतीला धावले, उपचारासाठी उपमुख्यमंत्र्यांनी केली मोठी आर्थिक मदत …अन् एकनाथ शिंदे विनोद कांबळीच्या मदतीला धावले, उपचारासाठी उपमुख्यमंत्र्यांनी केली मोठी आर्थिक मदत
माजी क्रिकेट विनोद कांबळी याची प्रकृती खालावली आहे, त्याला उपचारासाठी भिवंडी येथील आकृती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या विनोद...
“आम्हाला नेहमी सन्मानाने वागवलं”, प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना अखेरचा निरोप देताना कलाकार भावूक ; अनेकांनी केल्या भावना व्यक्त
होमिओपॅथी औषध म्हणजे नेमकं काय? फायदे ऐकुण व्हाल थक्क…
वायू प्रदूषणाचा प्रकोप… अर्ध्या देशाला नाक, कान आणि घशाच्या आजाराने ग्रासले; रिपोर्टमधील दावा चिंताजनक
सुप्रसिद्ध आयफेल टॉवरला आग, 1200 लोकांची सुटका
राज्यात बदल्यांचे सत्र सुरूच, 12 सनदी अधिकाऱ्यांची बदली
Jammu Kashmir – जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले, पाच जवानांचा मृत्यू; चार जण जखमी