Kurla bus accident update – मृतांचा आकडा 6 वर, 43 जखमींवर उपचार सुरू; सर्वांची ओळख पटली

Kurla bus accident update – मृतांचा आकडा 6 वर, 43 जखमींवर उपचार सुरू; सर्वांची ओळख पटली

मुंबईतील कुर्ला येथे सोमवारी रात्री भरधाव वेगातील बेस्टच्या एसी बसने अनेक गाड्यांसह पादचाऱ्यांना उडवले. या अपघातामध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 43 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांची ओळख पटली असून यात तीन महिलांचा आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

कन्नीस अन्सारी (वय – 55, स्त्री), आफरीन शाह (वय – 19, स्त्री), अनम शेख (वय – 20, स्त्री), शिवम कश्यप (वय – 18, पुरुष), विजय गाडकवाड (वय – 70, पुरुष) आणि फारूक चौधरी (वय – 54, पुरुष) अशी मृतांची नावे आहेत.

तर मुस्कत खान, (वय – 4), मोहम्मद एजाज (वय – 18), आशुतोष (वय – 18), अनिल शहा (वय – 32), फजलू अहमद (वय – 52), तनवीर कुरेशी (व.य – 29), मोहम्मद साजिद (वय – 23), साबीर हुसैन (वय – 32), सुखराम (वय – 18), महेशकुमार (वय – 29), अमन खान (वय – 24), अतुल वानरे (वय – 35), अमर सातसकर (वय – 35), दानीश मन्सुरी (वय – 27), हरविंदर सिंग (वय – 51), अख्तर खान (वय – 52), बशिरा शेख (वय – 58), सरोज कुमार (वय – 56), सुमैल सय्यद (वय – 55), इरफान शेख (वय – 50), आफताब खान (वय – 45), रेहमुनिस्सा (वय – 45) या जखमींवर कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तर उमेर अब्दुल गफूर (वय – 35) यांच्यावर सीटी रुग्णालयात, आरिफ शेख (वय – 30), मेहरबान खान (वय – 26) या गंभीर जखमींवर कोहिनूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर रविंद्र भास्कर (वय – 56), आकाश पराड़े (वय 25) यांच्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासह संतोष कदम (वय – 55) आणि विजय ठोंबरे (वय – 40) या पोलीस कर्मचाऱ्यांवर येथे उपचार सुरू आहेत.

Kurla bus accident – ना बसमध्ये तांत्रिक बिघाड, ना चालकाचं मद्यप्राशन; पोलिसांनी सांगितलं अपघाताचं खरं कारण

अफरोज एहमद (वय – 20), आफताफ बिश्नोई (वय – 45), अजामतून शेख (वय – 54), मुजफ्फर शेख (वय – 52) यांच्यावर हबीब रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पंकज सिंह (वय – 35), मेहताब शेख (वय 22), रहमत अन्सारी (वय – 48), मस्तानशेख (वय – 29), फजलू रहमान (वय – 52), सिद्धु कुमार (वय – 16) यांच्यावर सायन रुग्णालयात, फाजिल मोहम्मद (वय – 49) आणि स्नेजल राजेश हेजिस्ते (वय – 34) यांच्यावर फौजिया रुग्णालयात, तर मोहम्मद इक्बाल खान (वय – 75) यांच्यावर कुर्ला नर्सिंग होम येथे उपचार सुरू आहेत.

Kurla bus accident – कुर्ला स्टेशनच्या बस सेवा बंद, प्रवाशांचे हाल

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अल्लू अर्जुन प्रकरणात मोठी अपडेट; आणखी एकाला अटक अल्लू अर्जुन प्रकरणात मोठी अपडेट; आणखी एकाला अटक
हैदराबादच्या संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेता अल्लू अर्जुनचा बाऊन्सर अँथनी याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. 4...
बोनी कपूर यांच्या प्रपोजलनंतर श्रीदेवींनी धरला होता अबोला; “विवाहित अन् 2 मुलांचे पिता असून तुम्ही..”
पोलिसांच्या चौकशीदरम्यान अल्लू अर्जुन भावूक; चेंगराचेंगरीचे व्हिडीओ पाहून..
चेंगराचेंगरीत दुखापतग्रस्त झालेल्या मुलाकडून 20 दिवसांनंतर प्रतिसाद; वडील म्हणाले “अल्लू अर्जुनने..”
शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला राजगड; आग्र्याहून सुटकेचा 358 वा स्मृतिदिन साजरा
चुकीच्या वृत्तांमुळे राहुरी कृषी विद्यापीठाची बदनामी, कर्मचाऱ्यांकडून निषेध; कुलसचिवांना दिले निवेदन
प्रीपेड मीटरला गडहिंग्लजमध्ये नागरिकांचा विरोध, 6 जानेवारीला महावितरण कार्यालयावर काढणार मोर्चा