विरारमध्ये चप्पल दुकानांना लागली भीषण आग, तीन दुकाने जळून खाक
विरारमध्ये दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. येथील साईनाथ नगर भागात चप्पल दुकानांना आग लागल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी 6 च्या सुमारास ही घटना घडली. दुकानांना आग लागल्यावर तात्काळ स्थानिकांनी अग्निशमन दलाला संपर्क केला. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या तासभरातच आगीवर नियंत्रण मिळविले.
आग लगल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. या आगीची माहिती येथील नागरिकांनी वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. तसेच घटनास्थळी पोलीसही दाखल झाले होते. अग्निबंबाच्या साहाय्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या तासाभरातच आगीवर नियंत्रण मिळवलं. या दुर्घटनेत तीन दुकाने जळून खाक झाली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. असं असलं तरी आगीमुळे दुकान मालकांचे आठ ते नऊ लाखांचे नुकसान झाल्याचे दुकान मालकांनी सांगितले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List