दक्षिण कोरियात राष्ट्राध्यक्षांना करण्यात आली प्रवास बंदी, वाचा काय आहे कारण…

दक्षिण कोरियात राष्ट्राध्यक्षांना करण्यात आली प्रवास बंदी, वाचा काय आहे कारण…

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक-येओल यांच्यावर सोमवारी प्रवासी बंदी घालण्यात आली. मार्शल लॉ लागू केल्यामुळे त्यांच्यावर ही बंदी घालण्यात आली आहे, असे दक्षिण कोरियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यापासून मार्शल लॉ लागू झाल्यामुळे दक्षिण कोरियाचे पोलीस त्याच्याविरुद्ध बंडखोरीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी प्रवास बंदीचा विचार करत होते. त्यानंतर आज त्यांच्यावर ही बंदी घालण्यात आली आहे.

गेल्या मंगळवारी युन सुक-येओल यांनी विरोधी पक्षाने उत्तर कोरियाशी संगनमत केल्याचा आणि देशविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याचा आरोप करत देशात मार्शल लॉ लागू केला होता. यानंतर त्यांना देशभरातून मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता. विरोधी पक्षांनी त्यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणला होता, मात्र मंजूर होऊ शकला नाही.

सत्ताधारी पक्षाच्या बहुतांश खासदारांनी महाभियोग प्रस्तावावर मतदानावर बहिष्कार टाकला होता, त्यामुळे विरोधकांना तो मंजूर करण्यासाठी आवश्यक 200 मते मिळवता आली नाहीत. मात्र बुधवारपासून दक्षिण कोरियात संसदेचे नवीन अधिवेशन सुरू होत आहे. अशातच विरोधक पुन्हा एकदा महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या विचारात आहेत. दरम्यान, देशभरातून विरोध झाल्यानंतर मार्शल लॉ मागे घेण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अल्लू अर्जुनच्या अटकेचा ‘पुष्पा 2’ च्या निर्मात्याला मोठा धक्का; घेतला आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय अल्लू अर्जुनच्या अटकेचा ‘पुष्पा 2’ च्या निर्मात्याला मोठा धक्का; घेतला आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय
अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटानं भल्या -भल्या चित्रपटाच्या कमाईचे रेकॉर्ड ब्रेक...
भाजप ईडी, सीबीआय सारखी अस्त्र वापरणार; खासदार अरविंद सावंत यांची टीका
हेच का राज्य सरकारचे युवा धोरण, कंत्राटी नोकरभरतीवर रोहित पवार यांचा सवाल
…अन् एकनाथ शिंदे विनोद कांबळीच्या मदतीला धावले, उपचारासाठी उपमुख्यमंत्र्यांनी केली मोठी आर्थिक मदत
“आम्हाला नेहमी सन्मानाने वागवलं”, प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना अखेरचा निरोप देताना कलाकार भावूक ; अनेकांनी केल्या भावना व्यक्त
होमिओपॅथी औषध म्हणजे नेमकं काय? फायदे ऐकुण व्हाल थक्क…
वायू प्रदूषणाचा प्रकोप… अर्ध्या देशाला नाक, कान आणि घशाच्या आजाराने ग्रासले; रिपोर्टमधील दावा चिंताजनक