‘मिरग’ आणि ‘बराबर है’ लघुपटांनी मारली बाजी, साठ्ये महाविद्यालयात रंगली विनय आपटे प्रतिष्ठानची स्पर्धा

‘मिरग’ आणि ‘बराबर है’ लघुपटांनी मारली बाजी, साठ्ये महाविद्यालयात रंगली विनय आपटे प्रतिष्ठानची स्पर्धा

विनय आपटे प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेत 25 वर्षांखालील गटात पूर्वा जळगांवकर यांचा ‘बराबर है’ आणि 25 वर्षांवरील वयोगटात अभिजीत झुंजारराव यांच्या ‘मिरग’ या लघुपटाने प्रथम पारितोषिक पटकावले. यंदा तब्बल 51 लघुपटांनी स्पर्धेत भाग घेतला.

नवोदितांना संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्पर्धा भरवण्यात येते, असे वैजयंती आपटे यांनी सांगितले. यंदाच्या स्पर्धेत 25 वर्षांखालील वयोगटात दुसरा क्रमांक मल्हार कुलकर्णी यांच्या ‘फिरकी’ आणि तिसरा क्रमांक अन्विता वैद्य यांच्या ‘सुपर हीरो’ या लघुपटास मिळाला. 25 वर्षांवरील वयोगटात दुसरे पारितोषिक अभिजीत श्वेतचंद्र यांच्या ‘बेचकी’ लघुपटास तर तिसरे पारितोषिक अक्षय वासकर यांच्या ‘शाहीस्त्या’ लघुपटास मिळाले.

साठ्ये महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात पारितोषिकप्राप्त लघुपट दाखवण्यात आले. स्पर्धेसाठी प्रतिमा कुलकर्णी, पुरषोत्तम बेर्डे, रोहिणी निनावे, भक्ती मायाळू, राजन वाघदरे आणि भरत दाभोळकर यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. साठ्ये महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या परितोषिक वितरण सोहळ्याला अभिनेते सचिन खेडेकर, पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर आणि सुनील बर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ख्रिसमसवर बोलणारे पंतप्रधान मणिपूरवर का बोलत नाहीत? काँग्रेसचा नरेंद्र मोदी यांना सवाल ख्रिसमसवर बोलणारे पंतप्रधान मणिपूरवर का बोलत नाहीत? काँग्रेसचा नरेंद्र मोदी यांना सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी ख्रिसमसवर बोलतात. नाताळनिमित्त सामाजिक सौहार्दाबद्दल बोलतात. जर्मनीतील बाजारात झालेल्या हल्ल्याचा निषेध करतात. परंतु, मणिपूरवर चकार शब्दही काढत...
Vinod Kambli health news – विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताच्या गाठी 
PKL 2024 – यूपी योद्धाजची बंगळुरू बुल्सवर मात
हरलीनच्या शतकाने हिंदुस्थानचा मालिका विजय; वेस्ट इंडीजवर केली 115 धावांनी मात
Champions Trophy 2025 Schedule – हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेटयुद्धाला 23 फेब्रुवारीचा मुहूर्त
मुलुंड कोर्टात सापाने उडवली घाबरगुंडी! तासभर न्यायालयीन कामकाज खोळंबले
एमपीएससी परीक्षेची कमाल वयोमर्यादा शिथिल, शिवसेनेच्या मागणीला यश