बापरे! गाढविणीच्या दुधाला सोन्याएवढी किंमत का असते?; एका लिटरचा भाव चक्क 7 ते 10 हजार
सध्या चांगल्या कंपनीचे दूध विकत घ्यायचं म्हटलं तर जवळपास एक लिटर दुधाची किंमत ही 60 ls 70 रुपयांच्या घरात नक्कीच जाते. पण तुम्हाला जर गाढविणीच्या दुधाची किंमत समजली ना तर तुम्हाला थक्क व्हायला होईल. कारण या दुधाची किंमत पाहाता त्याला पांढरे सोने म्हणतात. म्हणज तुम्हाला याचा अंदाजा लावत येऊ शकतो.
गाढवीणीचे दूधाला पांढरे सोने का म्हटले जाते?
गाढवणीच्या दुधाला सात ते दहा हजार रुपये प्रति लिटर इतका दर असतो. यावरून या दुधाला अगदी सोन्याप्रमाणे भाव असल्याने त्याला पांढरे सोने म्हटले जाते. जर गुजरात राज्याचा विचार केला तर या ठिकाणी प्रामुख्याने गाढवीणीचे दूध विकले जाते. भारतात गाढविणीच्या दुधाचा व्यापार जुन्या काळी केला जायचा पण आता तेवढ्यापद्धतीने उपयोग तर होतच नाही पण त्याबद्दल आता कोणाला फारस माहिती नाही.
भारतामध्ये जरी या दुधाची मागणी आणि लोकप्रियता फारशी दिसून येत नसली तरी प्रत्येक गाढवीण दिवसाला फक्त चार कप म्हणजेच अर्धा ते एक लिटर पर्यंत दूध देते. त्यामुळे हे दूध सहजासहजी उपलब्ध होत नाही. तसेच हे दूध लवकर हवेच्या संपर्कात बऱ्याच वेळ राहिले तर ते खराबही होते. त्यामुळे इतर दुधाच्या तुलनेत या दुधाची किंमत जास्त असते. भारतामध्ये सध्या गाढवीणीच्या दुधाची मागणी वाढत असल्याने हे दूध मिल्क पावडरच्या स्वरूपात देखील विकले जात आहे.
या दुधाचा वापर सौंदर्यप्रसाधनांसह औषध तयार करण्यासाठी देखील केला जातो. सध्या जर आपण गुजरात व दक्षिणेकडील काही राज्यांचा विचार केला तर या दुधाची मागणी वाढत असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक लोक स्टार्टअप म्हणून या व्यवसायाकडे वळताना आपल्याला दिसून येत आहे.
गाढविणीच्या दुधाचे फायदे?
दुधाची मागणी वाढताना दिसून येत आहे,तसेच दुधाचे गुणकारी फायदे कळायला लागले आहेत . तसेच आता सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील काही जाणकारांकडून लोकांपर्यंत या दुधाचे महत्त्व पोहोचवले जात आहे.
रिपोर्टनुसार गाढवीणीचे दूध चेहऱ्याच्या त्वचेवरील सुरकुत्या दूर करते. तसेच या दुधामुळे त्वचेचा रंग उजळतो व त्वचा मऊ होते. गाईचे आणि गाढविणीच्या दुधामध्ये अनेक पौष्टिक साम्य असल्याचे बोलले जाते. या दुधामध्ये विटामिन डी आणि खनिजे जास्त असतात.
जर आपण हेल्थच्या दृष्टीकोनातून पाहिले तर या दुधामध्ये कमी फॅट आणि कॅलरीज असतात. तसेच गाढविणीच्या दुधात असणारे प्रोटीन शरीरात काही जिवाणू आणि विषाणूंना वाढण्यापासून रोखू शकतात. ज्या लोकांना गाईच्या दुधाच्या प्रथिनांची एलर्जी असते असे लोक गाढविणीच्या दुधाचे सेवन करू शकतात. यामागील प्रमुख कारण म्हणजे या दुधात केसीनची पातळी कमी असल्याने या दुधामुळे एलर्जी होत नाही.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
तसेच या दुधाच्या सेवनाने वजन आणि उंची वाढवणे देखील शक्य आहे. शरीराला कॅल्शियम शोषण्यास मदत करणारे लॅक्टोज आणि मजबूत हाडांसाठी आवश्यक असणारी खनिज या दुधामध्ये आढळून येतात. 2010 च्या प्रयोगशाळेतील एका अभ्यासानुसार बघितले तर हे दूध सायटोकाइन्स या प्रोटीनचे शरीरातील प्रमाण वाढवायला मदत करते.तसेच हे प्रोटीन रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहे. तसेच एका अभ्यासात असे म्हटले गेले आहे की, या दुधामुळे शरीरातील पेशी नायट्रिक ऑक्साईड तयार करतात व त्यामुळे रक्तवाहिन्या विस्तारण्यास तसेच रक्तदाब कमी करण्यास आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.
अँटीएजिंग आणि ब्युटी सप्लिमेंट प्रोडक्ट्स बनवण्यासाठी केला जातो वापर
गाढविणीच्या दुधाचा वापर ब्युटी सप्लिमेंट आणि अँटी एजिंग प्रॉडक्ट बनवण्यासाठी देखील केला जातो. याशिवाय गाढविणीच्या दुधापासून बनवलेले चीज हे जगातील सर्वात महाग चीज मानले जाते. उत्तर सर्बीयामध्ये या दुधापासून बनवलेल्या चीजची किंमत एक किलोला 70 हजार रुपये इतकी आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List