मुंबईतून सर्वाधिक कर जमा होऊनही तेवढ्या सुविधा मिळत नाही, आमदार महेश सावंत यांची टीका
मेट्रो कारशेडच्या नावाखाली झाडांच्या कत्तली होत आहेत असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार महेश सावंत यांनी केला आहे. तसेच मुंबईतून सर्वाधिक कर जमा होतो पण तेवढ्या सुविधा मिळत नाहीत असेही सावंत म्हणाले.
एबीपी माझाशी बोलताना सावंत म्हणाले की, मुंबईतले रस्ते बनवण्याचे कंत्राट मुंबईच्या बाहेरच्या कंत्राटदारांना दिले जात आहे. या कंत्राटदारांना मुंबईबद्दल माहित नसतं आणि त्यामुळे सामान्य मुंबईकरांना त्रास होतो. मुंबईतून सर्वाधिक कर जमा होतो, पण त्या तुलनेत तेवढ्या सुविधा मिळत नाहीत.
तसेच उद्धव ठाकरे यांनी कांजूरमार्गला कारशेडसाठी योग्य जागा दिली होती. पण भाजपने आडमुठी भुमिका घेतली. मेट्रो कारशेडच्या नावाखाली झाडांच्या कत्तली होत आहेत. त्याचे दुष्परिणाम मुंबईकरांना भोगावे लागणार आहेत. पर्यावरणाची हानी न करता मुंबईकरांना सोयी सुविधा देणे गरजेचे आहे. भाजपला मेट्रो गुजरातला जोडायची आहे. व्ययक्तिक फायद्यासाठी लोकांचा विचार केला जात नाही हे चुकीचं आहे असेही सावंत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List