प्रसाद ओकच्या पत्नीने मागितली आदिनाथ कोठारेची माफी, कारण…
Manjiri Oak Apologise Adinath Kothare : अभिनेता आणि दिग्दर्शक आदिनाथ कोठारेने दिग्दर्शित केलेला पाणी हा चित्रपट 18 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटातून दुष्काळग्रस्त भागातील भीषण परिस्थिती मांडण्यात आली आहे. मराठवाड्यातील गावात पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या हनुमंत केंद्रे यांच्या संघर्षाची कहाणी यातून मांडण्यात आली आहे. या चित्रपटात आदिनाथ कोठारेने मुख्य भूमिका साकारली आहे. नुकतंच अभिनेता प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकने पाणी हा चित्रपट पाहिला आहे. त्यानंतर मंजिरीने त्याची माफी मागितली आहे.
आदिनाथ कोठारेचं दिग्दर्शन असलेला ‘पाणी’ या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मंजिरी ओकने नुकतंच पाणी हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर मंजिरी भारावून गेली आहे. यानंतर तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आदिनाथ कोठारेचे कौतुक केले आहे.
मंजिरी ओकची पोस्ट
“सगळयात आधी मला ही फिल्म बघायला उशीर झाला त्यासाठी आदिनाथ खूप सॉरी… आदिनाथ काय बोलू ? ही तुझी पहिली फिल्म कशी असू शकते ? तू खोटं बोलतोयस…अप्रतिमम्मम. फिल्मविषयी बोलयाला माझ्याकडे काही ही ही शब्द नाहीत. एकच सांगते ज्या क्षणी नागदरवाडीत विहिरीला पाणी लागलं. त्याक्षणी माझ्या आणि मला खात्री आहे की अनेकांच्या डोळ्यातून पाणी आलं . आणि तुझ्या घेतलेल्या कष्टांचं चीज झालं.
सलाम हनुमंत केंद्रे ह्यांच्या जिद्दीला कष्टांना आणि त्यांच्या आणि सुवर्णा ताईंच्या प्रेमाला. आणि तुला खूप घट्ट मिठी आणि मनापासून धन्यवाद की ह्या विषयाची आम्हाला एक सुंदर अशी गोष्ट सांगितलीस .. तुझं खूप खूप खूप कौतुक. कृपया सगळ्यांनी #पाणी ही फिल्म नक्की बघा आजच अॅमेझॉन प्राईमवर #पाणी”, असे मंजिरी ओक म्हणाली.
प्रियांका चोप्रासह नेहा बडजात्याची निर्मिती
दरम्यान, ‘पाणी’ हा चित्रपट 18 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात आदिनाथ कोठारेसोबत रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनास आणि डॉ मधु चोप्रा यांनी केली आहे. अॅमेझॉन प्राईमवर हा चित्रपट उपलब्ध आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List