VIDEO : मतदानापूर्वी अमित ठाकरे-सदा सरवणकर समोरासमोर, पुढे काय घडलं?

VIDEO : मतदानापूर्वी अमित ठाकरे-सदा सरवणकर समोरासमोर, पुढे काय घडलं?

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात 288 मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे. या 288 जागांसाठी 4 हजार 136 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होत आहे. महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे. त्यातच आता मुंबईत एक मोठी घडामोड घडली आहे.

मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मनसेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरेंच्या विरुद्ध शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत हे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. त्यातच आता मतदानापूर्वी अमित ठाकरे आणि सदा सरवणकर हे एकमेकांसमोर आले आहेत.

सिद्धिविनायक मंदिरात एकमेकांची भेट

अमित ठाकरे हे मतदान करण्यापूर्वी श्री सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी सदा सरवणकर हे देखील श्री सिद्धिविनायक मंदिरात गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले. यावेळी श्री सिद्धिविनायक मंदिराच्या पटांगणात अमित ठाकरे आणि सदा सरवणकर हे एकमेकांसमोर आले. यावेळी त्यांनी दोघांनी हात मिळवत एकमेकांनी शुभेच्छा दिल्या. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला.

अमित ठाकरे-सदा सरवणकर काय म्हणाले?

यानंतर सदा सरवणकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना आम्ही एकमेकांना शुभेच्छा दिल्या, असे सांगितले. यानंतर अमित ठाकरे यांनी याबद्दल भाष्य केले. “मी या निवडणुकीच्या धामधुमीत पहिल्यांदा त्यांना भेटलोय. आम्ही एकमेकांना शुभेच्छा दिल्या. मी माझे १०० टक्के दिले आहेत. त्यामुळे लोकांनी ठरवायचं की आता काय करायचं आहे”, असे अमित ठाकरे म्हणाले.

“आपल्याला २३ नोव्हेंबरला कौल काय आहे ते समजेल. मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मी लोकांपर्यंत पोहोचलो आहे. त्यामुळे आता लोकांनी याबद्दल निर्णय घ्यावा. मी अतिआत्मविश्वासात काहीही बोलणार नाही. आम्ही दोघेही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत. पण ही लढाई वैयक्तिक नाही. आम्ही आमचं व्हिजन लोकांसमोर सांगतोय. त्यामुळे लोकांनी ठरवावं. राज ठाकरे हे पहिल्यांदा मला मतदान करणार आहे”, असेही अमित ठाकरेंनी म्हटले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sharmila Thackeray : मला अमितचा मोठा विजय हवाय, छोटा विजय नकोय – शर्मिला ठाकरे Sharmila Thackeray : मला अमितचा मोठा विजय हवाय, छोटा विजय नकोय – शर्मिला ठाकरे
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माहीममध्ये बिग फाईट आहे. माहिम विधानसभा मतदारसंघाची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज...
‘माझ्या बाबाला…’, मतदानाच्या दिवशी राज ठाकरे यांच्या नातवाचा क्यूट फोटो व्हायरल
सदा सरवणकर, अमित ठाकरे या तगड्या उमेदवारांना भिडणारे महेश सावंत सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर म्हणाले…
मुलीच्या नावावरून अभिनेत्रीला घाणेरडे मेसेज; वैतागून म्हणाली ‘मला अनफॉलो करा’
हिंदू असलेल्या ए आर रेहमान यांनी का स्वीकारला इस्लाम धर्म? घटस्फोटामुळे खासगी आयुष्य चर्चेत
Bigg Boss 18: बापरे आता हे काय? राशन मिळवण्यासाठी स्पर्धकांना खेळावा लागला किसिंग टास्क; टास्कनंतर प्रत्येकाचा विचित्र अनुभव
‘अशोक मा. मा.’ची आगळी वेगळी धमाल कथा; या तारखेपासून मालिका प्रेक्षकांच्या भेटीला