जरांगे लढणार नाहीत; निवडणुकीतून माघार पण पाडापाडी करणार

जरांगे लढणार नाहीत; निवडणुकीतून माघार पण पाडापाडी करणार

रविवारी रात्री भावूक होत मनोज जरांगे-पाटील यांनी काही मतदारसंघांत उमेदवार देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र सोमवारी सकाळी केवळ एका जातीच्या जोरावर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही, असे स्पष्ट करीत त्यांनी विधानसभेच्या मैदानातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. निवडणुकीतून माघार घेत असलो तरी पाडापाडी मात्र करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष उतरायचे का? यावर आंतरवाली सराटीत आठ दिवसांपासून चर्चा सुरू होती. विविध जातीधर्माचे लोक भेटून गेल्यानंतर मनोज जरांगे यांनी स्वतः विधानसभेच्या रणांगणात पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचे संकेत दिले होते. रविवारी रात्री पत्रकारांशी बोलताना त्यांनी 14 मतदारसंघांची नावे जाहीर केली. सोमवारी सकाळी उमेदवारांची नावे जाहीर करणार असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे मनोज जरांगे जाहीर करणार असलेल्या उमेदवारांबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. परंतु पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे स्पष्ट केले. रात्री उशिरापर्यंत मराठा समाजाची बैठक झाली. या बैठकीत कोणत्याही एका जातीच्या जोरावर निवडणूक लढणे आणि जिंकणे सोपे नाही, उमेदवार दिला आणि तो पडला तर समाजाचा अपमान होईल. त्याबरोबरच मित्रपक्षांकडून येणाऱया यादीची आम्ही वाट पाहत होतो. परंतु त्यांची यादी आली नाही, म्हणून विधानसभा न लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले. निवडणुकीतून माघार घेत असलो तरी पाडापाडी मात्र करणारच, असे सांगतानाच  कोणत्याही अपक्षाला पिंवा राजकीय पक्षाला पाठिंबा दिला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू राहणारच असल्याचेही ते म्हणाले.

 आपल्यावर कुणाचाही दबाव नाही

निवडणुकीतून माघार घेण्यासाठी आपल्यावर दबाव होता का, असे विचारले असता मनोज जरांगे यांनी त्यास स्पष्टपणे नकार दिला. आपल्यावर कोणाचाही दबाव असण्याचे कारण नाही, निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय मराठा समाजाच्या बैठकीत घेतला असल्याचे ते म्हणाले.

केवळ एका जातीच्या जोरावर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. आम्ही राजकारणात नवखे आहोत. उमेदवार उभा करून तो पडला तर जातीची इभ्रत जाईल. म्हणूनच विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप; नालासोपाऱ्यात तुफान राडा, काय कारवाई होणार? निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप; नालासोपाऱ्यात तुफान राडा, काय कारवाई होणार? निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया
भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. बहुजन विकास आघाडीकडून विनोद तावडे यांच्यावर आरोप करण्यात आला...
Vinod Tawade : विनोद तावडे यांचा गेम? 5 कोटी घेऊन आल्याची भाजपमधूनच टीप, हितेंद्र ठाकुरांचा गौप्यस्फोट
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआनं नोटाचे बंडलच दाखवले, exclusive Photos
निवडणुकीतील भाजपचा खेळ संपला…नालासोपरातील प्रकरणानंतर संजय राऊत यांचा हल्ला
पैशांचं बंडल सापडल्यानंतर ठाकूर पिता-पुत्र आणि तावडेंची पत्रकार परिषद निवडणूक आयोगाने थांबवली, आता पुढे काय?
धमाल रोड ट्रिपची कमाल गोष्ट… ‘श्री गणेशा’चा टिझर प्रदर्शित
लग्नानंतर माधुरीने का सोडली इंडस्ट्री? 25 वर्षांनंतर पश्चात्ताप? म्हणाली “माझी मुलं..”