चार वर्षे पाणी पाजल्यानंतर यंगचे भाग्य फळफळले
नशिबापेक्षा अधिक आणि वेळेच्या आधी कुणाला काहीही मिळत नाही. तसेच काहीसे न्यूझीलंडचा फलंदाज विल यंगच्या बाबतीत घडले. तब्बल चार वर्षे संघात राखीव खेळाडू म्हणून मैदानातील खेळाडूंना पाणी पाजणाऱ्या विल यंगला केन विल्यमसनच्या दुखापतीमुळे संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचे सोने करत न्यूझीलंडच्या ऐतिहासिक विजयात सिंहाचा वाटा उचलला.
विल यंगने 2020 साली हॅमिल्टन कसोटीत वेस्ट इंडीजविरुद्ध पदार्पण केले. त्यानंतर तो संघात सारखा आत-बाहेर होत होता. अधिक काळ त्याचा संघातला वावर पाणक्या म्हणूनच होत होता, पण खेळाडूंना पाणी पाजण्याचे काम करताना खेळाडूंच्या भावना जाणून घेण्याची संधी लाभली हे माझ्यासाठी महत्त्वाचे ठरल्याची भावना यंगने बोलून दाखवली. काल झालेल्या मालिकेत सर्वाधिक 244 धावा करणारा यंग मालिकावीर ठरला. हा सन्मान मिळवल्यानंतर यंग म्हणाला, जेव्हा कधी मला संधी मिळायची, मी खूप उत्साहित असायचो. मी कधीही केन विल्यमसनची जागा घेण्याचा प्रयत्न केला नाही. मी केवळ माझा नैसर्गिक खेळ केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List