Abu Azmi Heart Attack : मोठी बातमी! अबू आझमी यांना हृदयविकाराचा झटका

Abu Azmi Heart Attack : मोठी बातमी! अबू आझमी यांना हृदयविकाराचा झटका

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी दरम्यान मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. समाजवादी पक्षाचे ताकदवान नेते अबू आझमी यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहे. अबू आझमी यांच्याकडूनही त्यांच्या मानखुर्द-शिवाजीनगर या मतदारसंघात प्रचार करत होते. विशेष म्हणजे या मतदारसंघातून ते सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांची या मतदारसंघात मोठी ताकद आहे. या मतदारसंघात मुस्लिमबहुल लोकसंख्या आहे.

अबू आझमी मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून गेल्या तीनही निवडणुकीत जिंकून आले असले तरी या निवडणुकीत परिस्थिती वेगळी आहे. अबू आझमी यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक हे देखील मानखुर्द-शिवाजीनगर येथून निवडणूक लढत आहेत. त्यामुळे अबू आझमी यांच्यासमोर कडवं आव्हान आहे. असं असताना त्यांना आज हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि समर्थकांकडून आझमी यांची प्रकृती लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना केली जात आहे.

अबू आझमी यांची प्रकृती सध्या ठीक असल्याची माहिती

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अबू आझमी यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. अबू आझमी यांना हृदय विकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या कार्यकर्त्याकंडून माहिती देण्यात आली आहे. “अबू आझमी यांची तब्येत बिघडली होती म्हणून त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र आता ते घरी परतले आहेत. अबू आझमी सध्या ठीक आहे”, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

अबू आझमी यांनी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त केली होती. महाविकास आघाडीत समाजवादी पक्षाचा विचार केला जात नाही, असा आरोप त्यांनी केला होता. पण नंतर त्यांची मनधरणी करण्यात महाविकास आघाडीला यश आलं होतं. अबू आझमी यांचा पक्षदेखील महाविकास आघाडीतला घटक पक्ष आहे. आझमी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जातात. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी त्यांची वेगळी आणि प्रभावशाली ओळख निर्माण केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चित्रपट येण्याआधीच ‘पुष्पा 2’च्या ट्रेलरने सर्व रेकॉर्ड मोडले; आता 1000 कोटींचा टप्पा पार करणार? चित्रपट येण्याआधीच ‘पुष्पा 2’च्या ट्रेलरने सर्व रेकॉर्ड मोडले; आता 1000 कोटींचा टप्पा पार करणार?
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरला 17 तासांत अप्रतिम प्रतिसाद मिळाला आहे. तेलुगू ट्रेलरला सर्वाधिक...
पुष्पापासून केजीएफ आणि बाहुबलीपर्यंत, या सिनेमाच्या यशात रविना टंडनच्या पतीचा हात
रोज एक अंड खाल्ल्याचा आहे चत्मकारीक फायदा, संशोधनातून समोर आली मोठी गोष्ट
International Mens Day 2024 : पुरुषांना असतो या 5 आजारांपासून धोका ? वेळीच व्हा सावध
अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक, देशमुख जखमी
Video – महाराष्ट्राची लूट थांबवण्यासाठी राज्याला जिंकवावेच लागेल; आदित्य ठाकरे यांची गर्जना
पर्यावरणमंत्र्यांवर राजकीय प्रदूषण करण्याची जबाबदारी; आदित्य ठाकरे यांचा भाजपला टोला