मुंबईसह महाराष्ट्रात तापमानात सातत्याने चढ-उतार, हवामान खात्याचा काय?

मुंबईसह महाराष्ट्रात तापमानात सातत्याने चढ-उतार, हवामान खात्याचा काय?

Maharashtra Weather Update : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. मुंबईसह सपूर्ण महाराष्ट्रातील तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. सध्या अनेक ठिकाणी रात्री काहीसा गारवा आणि दिवसा उकाडा अशी स्थिती पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुढील आठवडा वातावरण कसे असेल, याची माहिती समोर आली आहे. या हवामान बदलामुळे आरोग्याच्या तक्रारींमध्येही वाढ आहोत.

मुंबईतील तापमानात सातत्याने चढ-उतार सुरु आहेत. त्यामुळे रात्री काहीसा गारवा आणि दिवसा उकाडा अशी स्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. यामध्ये कमाल व किमान तापमानात घट अथवा वाढ होत आहे. पुढील दोन तीन दिवस कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळत आहे. तसेच किमान तापमानही वाढत असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

तापमानाचा पारा ३०-३१ अंश सेल्सिअस

मुंबईत पुढील दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असल्यामुळे पहाटे काहीसा गारवा जाणवेल. राज्याच्या कमाल तापमानात काही दिवसांनी घट होईल. त्यानंतर कमाल तापमानाचा पारा ३०-३१ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे

हवामान खात्याचा अंदाज

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रात सध्या कमालीची थंडी आहे. नाशिक, निफाड, धुळे या शहरांमध्ये कमाल आणि किमान तापमानात मोठी घट झाली आहे. त्यासोबतच आता संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रात तापमानात घट होणार आहे.

हिंदी महासागर, मालदीव आणि विषुववृत्ताजवळ चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. त्यासोबतच आग्नेय अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात झपाट्याने घट होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांना दिलासा

सध्या जळगाव, परभणी, गडचिरोली, गोंदिया, ब्रह्मपुरी, नागपूर, अमरावती येथे किमान तापमान 15 अंशांपेक्षा कमी नोंदवले गेले आहे. याशिवाय उर्वरित राज्यातील किमान तापमानातही घट दिसून येत आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रात रात्रीच्या वेळी हलकीशी थंडी आहे. कमाल आणि किमान तापमानात घट झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आज राज्यात आकाश निरभ्र राहून कमाल तापमानात चढ-उतार होईल आणि किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विधानसभा निवडणुकीमुळे चार दिवस मुंबईत दारूविक्री बंद विधानसभा निवडणुकीमुळे चार दिवस मुंबईत दारूविक्री बंद
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमुळे या आठवड्यात चार दिवस मुंबईत दारूविक्री बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना चार दिवस ड्राय डे पाळावा लागणार...
Abu Azmi Heart Attack : मोठी बातमी! अबू आझमी यांना हृदयविकाराचा झटका
तारक मेहताच्या शुटिंगदरम्यान राडा, जेठालाल यांनी कोणाची कॉलर पकडली?
हिवाळ्यात पोटातील अपचनाच्या समस्या सतावत आहेत, करा हे घरगुती उपाय
हिवाळ्यात मेथीची भाजी खाणे ठरेल फायदेशीर, वजन कमी करण्यासोबतच शरीर राहील उबदार
मधुमेहामुळे मानसिक आरोग्य धोक्यात? Diabetes Distress म्हणजे काय? जाणून घ्या
62 टक्‍के मुंबईकर अ‍ॅण्‍टीबायोटिक्‍स घेत स्‍वत:हून औषधोपचार करतात, सर्वेक्षणामध्ये धक्कादायक माहिती उघड