यंदाच्या निवडणुकीत कोट्यवधींची मालमत्ता जप्त, निवडणूक आयोगाच्या पथकाची जबरदस्त कामगिरी

यंदाच्या निवडणुकीत कोट्यवधींची मालमत्ता जप्त, निवडणूक आयोगाच्या पथकाची जबरदस्त कामगिरी

maharashtra assembly election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत यंदा निवडणूक आयोगाच्या पथकाने मोठी कामगिरी केली आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून बेकायदेशीर रक्कम, सोने, चांदी, दारु आणि अंमलीपदार्थ जप्तीची धडक कारवाई केली आहे. या कारवाईत आतापर्यंत एकूण ६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. सोमवारी विधानसभा निवडणुकीचा प्रचार तोफा थंड झाल्या. परंतु त्यानंतर दोन दिवस निवडणूक आयोगाचे पथके आणि पोलीस प्रशासन अधिकच सतर्क असणार आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होत आहे.

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

सोमवारी नाशिकच्या एका नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपये सापडले आहे. त्या रुपयांची मोजणी निवडणूक पथकाकडून करण्यात येत होती. ही रक्कम पाच कोटीहून अधिक रक्कम असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्या ठिकाणी राजकीय पक्षाच्या नेत्याची गाडी जप्त करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी मुंबईत ८० कोटींची चांदी जप्त करण्यात आली होती. त्यानंतर जळगाव आणि नागपूरमध्ये सोने, चांदीचे दागिने जप्त केले होते. हे दागिने सराफ व्यावसायिकांचे होते. परंतु त्यासंदर्भातील कागदपत्रे नसल्यामुळे ते जप्त केले होते.

आचारसंहित भंगच्या तक्रारीवर कारवाई

निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंगच्या तक्रारीवर कारवाई केली आहे. १५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ८ हजार ६७८ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ८ हजार ६६८ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विधानसभा निवडणुकीमुळे चार दिवस मुंबईत दारूविक्री बंद विधानसभा निवडणुकीमुळे चार दिवस मुंबईत दारूविक्री बंद
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमुळे या आठवड्यात चार दिवस मुंबईत दारूविक्री बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना चार दिवस ड्राय डे पाळावा लागणार...
Abu Azmi Heart Attack : मोठी बातमी! अबू आझमी यांना हृदयविकाराचा झटका
तारक मेहताच्या शुटिंगदरम्यान राडा, जेठालाल यांनी कोणाची कॉलर पकडली?
हिवाळ्यात पोटातील अपचनाच्या समस्या सतावत आहेत, करा हे घरगुती उपाय
हिवाळ्यात मेथीची भाजी खाणे ठरेल फायदेशीर, वजन कमी करण्यासोबतच शरीर राहील उबदार
मधुमेहामुळे मानसिक आरोग्य धोक्यात? Diabetes Distress म्हणजे काय? जाणून घ्या
62 टक्‍के मुंबईकर अ‍ॅण्‍टीबायोटिक्‍स घेत स्‍वत:हून औषधोपचार करतात, सर्वेक्षणामध्ये धक्कादायक माहिती उघड