वन नेशन वन इलेक्शनला दाक्षिणात्य अभिनेता विजयचा विरोध, पक्षात ठराव केला पास
तमिळ अभिनेता आणि टीव्हीके पक्षाचे अध्यक्ष विजय यांनी वन नेशन, वन इलेक्शनला विरोध केला आहे. यासाठी पक्षाची कार्यकारिणी बोलावून तसा ठरावही पास केला आहे.
आज तमिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक ठराव पारित करण्यात आले. त्यापैकी पहिला ठराव एक देश एक निवडणुकीविरोधात मांडण्यात आला. तसेच तमिळनाडू राज्याने नीट परीक्षा मागे घेण्यात यावी अशी मागणी केली.
द्रमुक सरकारने जातीनिहाय जनगणना केली नसल्याते विजय यांनी राज्य सरकारवही ताशेरे ओढले. तमिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी जनतेला खोटी वचनं दिली आणि सत्तेवर आले अशी टीका विजय यांनी दिली. टीव्हीके पक्ष 2026 ची तमिळनाडूची विधानसभा लढवणार अशी घोषणा यापूर्वीच विजय यांनी केली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List