हिवाळ्यात दिलासा देणारे फळ, अनेक आजारांवर रामबाण उपाय, फायदे इतके की…
प्रसिद्ध डॉ. प्रियांका सिंग यांच्या मते खजूरमध्ये प्रथिने, लोह, फॉलिक ॲसिड, कॅल्शियम, अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर, नैसर्गिक साखर, पोटॅशियम, झिंक, व्हिटॅमिन-बी6, ए आणि के, मॅग्नेशियम, मँगनीज यासारख्या पोषक तत्वांचा समावेश होतो.
खजूरमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आढळते, त्यामुळे ते बद्धकोष्ठतेपासून आराम देते आणि भूक नियंत्रित करते. एखाद्याला ॲनिमियाचा त्रास होत असेल तर तो याचे सेवन करू शकतो. कारण त्यात भरपूर लोह असते.
एखाद्याला उलट्या, जुलाब, खोकला किंवा उचकीचा त्रास होत असेल तर त्याने खजूर, तूप, पिपली, साखर यांचे मिश्रण मधात घ्यावे. तसेच शरीराच्या कोणत्याही भागातून रक्तस्रावाची समस्या असल्यास खजूराचे सेवनही करू शकता.
हाडे मजबूत करण्यासाठी खजूर चांगला असतो. एखाद्याची हाडे कमकुवत झाली तर त्याने खजूरचे सेवन करावे. कारण त्यात कॅल्शियम भरपूर असते. कोणाला लठ्ठपणा कमी करायचा असेल तर तो खजूर खाऊ शकतो. कारण यामुळे भूक नियंत्रित राहते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List