रोज पंधरा मिनिटं करा हे आसन, शरीराचा बेढबपणा जाईल आणि झोपही चांगली येईल

रोज पंधरा मिनिटं करा हे आसन, शरीराचा बेढबपणा जाईल आणि झोपही चांगली येईल

आजकाल सर्वाची लाईफस्टाईल बिघडली आहे. बदलेला आहार आणि व्यायाम न केल्याने अनेक आजाराचा धोका वाढला आहे. त्यामुळे वाढत्या वयात जर फिट रहायचे असेल तर योगासनं करणे आवश्यक आहे. योगासनं शरीराच्या लवचिकपणा आणि आरोग्यासाठी चांगली असतात. जर वजन कमी करायचं असेल आणि मानसिक आरोग्य नीट राखायचं असेल तर दररोज सुर्य नमस्कार करणे फायदेशीर आहे.सुर्य नमस्कारात 12 आसने लागोपाठ केली जातात. त्यातून अनेक लाभ मिळतात. सुर्य नमस्काराने काय फायदे मिळतात आणि तो कधी करायचा ते जाणून घ्या…

सुर्य नमस्काराने हे फायदे मिळतात…

वजन कमी करणे :

सूर्य नमस्कार एक कार्डिओव्हॅस्कुलर एक्सरसाईज आहे. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. हे आसन पोटाचे स्नायूना पसरवते. आणि कमरेजवळील चरबी कमी करते. वेगाने केलेला सुर्यनमस्कार मुव्हमेंट मेटाबॉलिझम वाढविण्यास मदत करतो.

चिंता दूर करणे :

जर तुम्ही जास्त चिंता करीत करीत असाल तर तो नियंत्रित करण्यासाठी सूर्यनमस्कार रोज करा. सुर्यनमस्कार रोज केल्याने तर आपण चिंतामुक्त आणि ताणतणावातून मुक्त होण्यास मदत होते. हे आसन थायरॉईडच्या प्रक्रीयेला सामान्य करते.

स्नायूंना मजबूत बनवते :

सूर्यनमस्कार स्नायू, सांध्यांना टोन करुन मजबूत बनवतो. या आसनाने माकड हाडाचा भाग लवचिक बनतो. जर हाड कमजोर असतील तर हे आसन अवश्य करावे.

त्वचा उजळण्यास मदत :

सुर्य नमस्कार रोज केल्याने रक्त संचारण वाढते. त्यामुळे आपली चेहऱ्याची त्वचा उजळण्यास मदत होते. त्वचा चमकदार बनते.

केव्हा करावे सुर्य नमस्कार :

सुर्य नमस्कार सर्वसामान्यत: सकाळी करायचे असतात. सकाळी हे आसन केल्याने शरीरासह मन देखील ताजेतवाने होते. सकाळच्या वेळी केलेल्या या आसनाने आपल दिवसभर उत्साही राहाता. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर सायंकाळी देखील तुम्ही सुर्य नमस्कार करु शकता. सायंकाळी केलेल्या सुर्यनमस्काराचा देखील फायदा होत असतो.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दीड हजार दिलेत… 3 हजार वसूल करणार! भाजपाच्या महिला उपाध्यक्षाची लाडक्या बहिणींना दमबाजी दीड हजार दिलेत… 3 हजार वसूल करणार! भाजपाच्या महिला उपाध्यक्षाची लाडक्या बहिणींना दमबाजी
1500 दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर 3000 रुपये वसूल करणार, अशी दमबाजी कोल्हापूर भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघाराणी जाधव यांनी...
पुण्यात पोलिसांनी जप्त केलेले 5 कोटी गेले कोठे? युवक काँग्रेसचा सवाल
मोदीजी, महाराष्ट्रात तुमची नाही, फक्त ठाकरेंची गॅरंटी चालते! उद्धव ठाकरे यांच्या दणदणीत सभा, भाजपवर जोरदार हल्ला
वांद्रे पूर्व – पुनर्विकासाचा प्रश्न निर्णायक ठरणार
महाराष्ट्राला गुजराष्ट्र, अदानीराष्ट्र करण्याचा भाजपचा डाव; आदित्य ठाकरे यांचा घणाघात
जीवनदायी सेवाकार्याला एक तप पूर्ण, बाळासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान उपक्रम
महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर मोदी युगाचा अस्त होईल, शरद पवार यांचे भाकीत