महाविकास आघाडीत CM कोण होणार? उद्धव ठाकरे यांचा मोठा खुलासा, थेट पक्का फॉर्म्युलाच सांगीतला

महाविकास आघाडीत CM कोण होणार? उद्धव ठाकरे यांचा मोठा खुलासा, थेट पक्का फॉर्म्युलाच सांगीतला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रत्येक दिवशी नवनवीन मुद्दे समोर येतात. त्यात एक मुद्दा जास्त चर्चिला गेला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोघेही मुख्यमंत्री कोण यावरून एकमेकांना चिमटे काढण्याची संधी सोडत नाहीत. या मुद्यावरून दोघांचा एकमेकांवर हल्लाबोल सुरू आहे. दोन्ही गट या मुद्यावरून एकमेकांना सारखे चिमटे काढत असतात. आता महायुतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.   त्यातच उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदावरून मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी एक पक्का फॉर्म्युला सांगीतला आहे.

आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून कोणतेही मतभेद नसल्याचे म्हटले आहे. आमच्या तीनही घटक पक्षात या मुद्दावरून कोणताही वाद नसल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी महायुतीवर निशाणा साधला. महायुतीमधील गद्दार मुख्यमंत्री कोण होणार हे आता सांगू शकतील का असा सवाल त्यांनी केला. त्यांनी महायुतीवर आगपाखड केली.

कोणताच फॉर्म्युला नाही, पण…

यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण याविषयी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या एका वक्तव्याचा आधार घेतला. शरद पवार यांनी सांगितले की, ज्याच्या जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री होईल. आमच्याकडे याविषयीची कोणताही फॉर्म्युला निश्चित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ताणतणाव ही मोठी गोष्ट नाही

महाविकास आघाडीचीच गोष्ट नाही. पण जेव्हा कोणतीही आघाडी, युती होते. तेव्हा प्रत्येक पक्षाला जास्त जागा हव्या असतात. त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू असतात. आम्ही आघाडी यासाठी करतो की सर्व जण सत्तेत यावेत. जागाबाबत थोडाफार ताणतणाव दिसतोच. पण त्यामुळे आघाडी तुटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी महायुतीवर तोंडसुख घेतले. त्यांच्याकडील गद्दारांच्या फौज आहे, त्यातील कोण सीएम होणार असा सवाल त्यांनी केला. त्यांनी मुख्यमंत्री कोण होणार ते पाहावे, आमच्यात तोंड खूपसू नये असा टोला पण त्यांनी लगावला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी मेट्रो वनच्या वेळेत वाढ, पहिली आणि शेवटची फेरी कधी सुटणार पाहा… निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी मेट्रो वनच्या वेळेत वाढ, पहिली आणि शेवटची फेरी कधी सुटणार पाहा…
मुंबईसह महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका येत्या 20 नोव्हेंबर रोजी आहेत. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी...
‘यावेळी मी स्वतःच नंदेकडे दिवाळीच्या फराळाचा डबा घेऊन गेले कारण..’, महागाईवरून सुप्रिया सुळेंचा सरकारला खोचक टोला
अक्षय कुमारचा 2025 मध्ये धुमाकूळच; 7 चित्रपट लागोपाट येणार; हॉरर, कॉमेडीसंग अॅक्शनचा तडका!
घरातील मोठी माणसं तुम्हाला अन्न चावून खाण्याच्या सल्ला देतात, जाणून घ्या त्याचे ५ जबरदस्त फायदे
मधुमेहाच्या रुग्णांनी न्याहारीमध्ये करावा ‘या’ ४ गोष्टींचा समावेश, शुगर लेव्हल राहील नियंत्रित
हिवाळ्यात ‘या’ 5 खाण्यापिण्याच्या सवयी टाळा, निरोगी आयुष्य जगा
शरीरात रक्ताची कमतरता असेल तर करा या पदार्थांचे सेवन, दहा दिवसात वाढेल रक्त