…जनतेला अशा घोषणा पसंत नाही; अशोक चव्हाणांचाही ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध
हरयाणा विधानसभा निवडणुकीत ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा देत भाजपने विजय मिळवला. हाच कित्ता महाराष्ट्रात गिरवण्याचा भाजपचा प्रयत्न असून ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा विधानसभा निवडणुकीत दिली आहे. पण भाजपच्या या घोषणेला सर्वप्रथम महायुतीमधून अजित पवार गटाने विरोध केला. त्यानंतर आता महाराष्ट्र भाजपमधील नेत्यांनीही विरोध केला आहे. पंकजा मुंडे यांच्यानंतर आता अशोक चव्हाण यांनीही ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांचा कंबर कसून प्रचार सुरू आहे. दरम्यान, भाजपने ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा दिल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजपच्या या घोषणेला महायुतीमधूनच विरोध होत आहे. अजित पवार गट, पंकजा मुंडे यांच्यानंतर अता अशोक चव्हाण यांनीही या घोषणेला विरोध दर्शवला आहे. ते म्हणाली के, ‘बटेंगे तो कटेंगी’ ही घोषणा पूर्णपणे अप्रासंगिक असून महाराष्ट्रातील जनतेला अशा घोषणा पसंत नाहीत. निवडणुकीत घोषणा दिल्या जातात. परंतु ही विशिष्ट घोषणा चांगली नसून लोकांना आवडेल असे मला वाटत नाही. मी अशा घोषणांच्या विरोधात आहे, कारण हे समाजासाठी अजिबात चांगले नाही. आम्हाला पहावं लागेल की, यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’या घोषणेला विरोध दर्शवला आहे.
आमच्या पक्षाची भूमिका ‘बटेंगे तो कटेंगे’ची नाही! – पंकजा मुंडे
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List