महाराष्ट्राचे शत्रू आता यांना तारणहार वाटू लागलेत; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

महाराष्ट्राचे शत्रू आता यांना तारणहार वाटू लागलेत; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महायुतीवर निशाणा साधला. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही टोला लगावला आहे. महाराष्ट्राचे शत्रू आता यांना तारणहार वाटू लागलेत, असं संजय राऊत म्हणालेत. एका मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं. या वर्षी मनसेच्या साथीने भाजपचा मुख्यमंत्री होईल, असं राज ठाकरे म्हणाले. त्यावर आता संजय राऊतांनी भाष्य केलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

याआधीही अनेकवेळा मनसे पक्षाने 25 वर्षे आमचं सरकार येईल, असं सांगण्यात आलं. अनेकवेळा त्यांचा आमदार विधानसभेत निवडून आला नाही. आता एखाददुसरा आमदार निवडून येण्यासाठी ते देवेंद्र फडणवीसांशी हातमिळवणी करत आहेत. महाराष्ट्राच्या शत्रूशी हातमिळवणी करत आहेत. भविष्यात राजकारणात चर्चा होईल. मनसेच्या मदतीनं सरकार येणार असेल. 150 जागा मनसेला मिळतील आणि फडणवीसांना 50 जागा मिळतील. महाराष्ट्रात भाजपला 50 जागा ही मिळणार नाहीत. गेल्या 2 महिन्यात असे काय झाले राज ठाकरे भाजपसोबत गेले. हा दबाव नेमका कुणाचा ईडीचा आहे की सीबीआयचा? ईडीचा दबाव आहे का?, असं संजय राऊत म्हणालेत.

येऊ द्या त्याचं सरकार… प्रत्येक बाप मुलाविषयी धडपड करत असतो. प्रत्येक बाप आपल्या मुलासाठी प्रयत्न करत असतो. मुलगा ही आमचा, आमच्या परिवारातला आहे. राज ठाकरे म्हणत होते अमित शाह, मोदींना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही. आता असं काय झालं? मोदी-शाह- फडणवीसांचं राजकारण महाराष्ट्रद्रोही आहे. राज ठाकरे मोदी शाहांना महाराष्ट्राचा शत्रू म्हणत होते. ते महाराष्ट्राच्या शत्रुंशी हातमिळवणी करत आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

तीन महिन्यांआधी वाटत होती की महाविकास आघाडीचं वगैरे सरकार येईल. पण आता वाटतं की सरकार हे महायुतीचंच होईल. ते इतकं सोपं नाहीये. आता आमच्या साथीने भाजपचा मुख्यमंत्री होईल. पुढच्यावेळी मनसेचा मुख्यमंत्री होईल, असं राज ठाकरे एका मुलाखतीत म्हणाले. त्यांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वादग्रस्त रश्मी शुक्ला यांना पुन्हा शासकीय सेवेत घेऊ नका, काँग्रेसची हायकोर्टात याचिका वादग्रस्त रश्मी शुक्ला यांना पुन्हा शासकीय सेवेत घेऊ नका, काँग्रेसची हायकोर्टात याचिका
पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे; पण निवृत्त झालेल्या रश्मी शुक्ला यांना पुन्हा सेवेत घेतले...
यम तुमच्या दारी…; मतदारांमध्ये हटके जनजागृती 
गोविंद पानसरे हत्या प्रकरण; एटीएसने कोर्टात सादर केला सीलबंद अहवाल
मावस भावाचा मूकबधिर मुलीवर लैंगिक अत्याचार
नितीन राऊत यांच्या कारला अपघात
चिरंतन चिंतन ; पंडित सी.आर. व्यास यांचा जीवनप्रवास उलगडला
मालमत्ता कर ‘ऑनलाइन’ भरण्याची प्रक्रिया सुरळीत