ED चा ससेमिरा पाठी; आता कोट्यवधींची संपत्ती, निवडणूक शपथपत्रातून दिसली श्रीमंती

ED चा ससेमिरा पाठी; आता कोट्यवधींची संपत्ती, निवडणूक शपथपत्रातून दिसली श्रीमंती

राज्यात ईडी, सीबीआय या यंत्रणेच्या गैर वापराचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी अनेकदा केला. विरोधकांना त्रस्त करण्यासाठी या यंत्रणाचा वापर केल्याचा सातत्याने आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे ज्या नेत्यांवर आर्थिक घोटाळ्याचा, गैर व्यवहारांचा ठपका ठेवण्यात आला. त्या मंडळींनी एकतर पक्षांतर केले अथवा त्यांनी सक्रीय राजकारणातून माघार घेतली. केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2019 पासून आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणात 132 खासदारांविरोधात PMLA गुन्हे दाखल करण्यात आले आहे. राज्यातील लोकप्रतिनिधींचा आकडा 43 इतका आहे. राज्यात ज्या नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहार, घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचे निवडणूक शपथपत्रातून दिसून आले आहे.

नेत्यांचा निघाला घामटा

गेल्या दहा वर्षांपासून देशात अनेक ठिकाणी विरोधकांना ईडी, सीबीआय, प्राप्तिकर खाते यांच्याकडून त्रास देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी अनेकदा केला आहे. ज्या नेत्यांवर आरोप केला. त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या गोटात प्रवेश केल्यावर त्यांच्याविरोधातील प्रकरणं थंड बस्त्यात टाकल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. भाजपा हे वॉशिंग मशीन असल्याचा मुद्दा विरोधकांनी प्रचार सभेत गाजवला होता. देशभरात अनेक ठिकाणी छापासत्र आणि धाडी घालण्यात आल्या. त्यात अनेक बड्या नेत्यांना तुरुंगाची हवा खावी लागली. पण केंद्र सरकारने विरोधकांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. नेत्यांवरील चौकशी प्रक्रिया सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे.

ईडीचा ससेमिरा, शपथपत्रानुसार कोट्यवधींची संपत्ती

राज्यातील काही नेत्यांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला होता. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही शिलेदारांवर आर्थिक घोटाळ्याचे, गैरव्यवहाराचे अथवा फसवणुकीचे आरोप करत त्यांची चौकशी करण्याचा घाट घालण्यात आला होता. त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. त्यासोबत त्यांनी शपथपत्र जोडले आहे. त्यात त्यांनी संपत्तीचा घोषवारा जोडला आहे.

अजित पवार यांची संपत्ती किती?

गेल्या पाच वर्षांत अजितदादांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात याविषयीचा घोषवारा दिला आहे. 2019 च्या तुलनेत त्यांच्या स्थावर मालमत्तेत 10 कोटींची वाढ झाली आहे. त्यांच्याकडे 37 कोटी 15 लाख 70 हजार 29 हजारांची स्थावर आणि 8 कोटी 22 लाख 60 हजार 680 रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. पती-पत्नीची एकत्रित मालमत्ता 95 कोटी 53 लाख 10 हजार 780 रुपये. त्यात एक किलो सोने, 35 किलो चांदीची भांडी, 20 किलो चांदीच्या भेटवस्तू आणि 21 किलो चांदीच्या मूर्तींचा समावेश आहे.

छगन भुजबळ यांच्या संपत्तीचा आकडा

तर छगन भुजबळ यांच्याकडे एकूण 11 कोटी 20 लाख 41 हजार रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्यावर 24 लाख 56 हजारांचे कर्ज आहे. भुजबळ यांच्या नावे दोन ठिकाणी शेतजमीन, दोन घरं आहेत. 3 लाख रुपये त्यांनी न्यायालयात अनामत रक्कम म्हणून भरले आहेत. भुजबळ यांच्याकडे 585 ग्रॅम सोनं आहे. त्यांच्या नावावर एक ट्रॅक्टर आहे. भुजबळ यांच्याकडे 11 कोटी 20 लाख 41 हजारांची मालमत्ता आहे. तर पत्नीच्या नावावर 16 कोटी 53 लाखांची मालमत्ता आहे. मागील पाच वर्षांत भुजबळ यांच्या मालमत्तेत 82 लाखांची भर पडली तर त्यांच्या पत्नीच्या संपत्तीत 3 कोटी 35 लाख रुपयांची भर पडली.

प्रताप सरनाईक यांची संपत्ती किती?

शिवसेना शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांच्या संपत्ती गेल्या 5 वर्षांत मोठी वाढ दिसून आली. त्यांच्या संपत्तीत या कालावधीत 100 कोटींपेक्षा अधिकची भर पडली आहे. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यावेली त्यांची एकूण संपत्ती 143 कोटी 97 लाख 18 हजार 745 इतकी होती. तर यंदाच्या विधानसभा निवडणुकांसाठी 2024, जोडलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती 271 कोटी 18 लाख 39 हजार 647 रुपये इतकी आहे. म्हणजे गेल्या पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत 128 कोटी रुपयांची वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वादग्रस्त रश्मी शुक्ला यांना पुन्हा शासकीय सेवेत घेऊ नका, काँग्रेसची हायकोर्टात याचिका वादग्रस्त रश्मी शुक्ला यांना पुन्हा शासकीय सेवेत घेऊ नका, काँग्रेसची हायकोर्टात याचिका
पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे; पण निवृत्त झालेल्या रश्मी शुक्ला यांना पुन्हा सेवेत घेतले...
यम तुमच्या दारी…; मतदारांमध्ये हटके जनजागृती 
गोविंद पानसरे हत्या प्रकरण; एटीएसने कोर्टात सादर केला सीलबंद अहवाल
मावस भावाचा मूकबधिर मुलीवर लैंगिक अत्याचार
नितीन राऊत यांच्या कारला अपघात
चिरंतन चिंतन ; पंडित सी.आर. व्यास यांचा जीवनप्रवास उलगडला
मालमत्ता कर ‘ऑनलाइन’ भरण्याची प्रक्रिया सुरळीत