बीडला बदलून गेलेले उपजिल्हाधिकारी पुन्हा शहरात
निवडणुकीच्या पावर्वभूमीवर एकाच पदावर 3 वर्षे पूर्ण झालेल्या उपजिल्हाधिकायांची बीडला बदली झाली, मात्र निवडणूक आयोगाच्या नाकावर टिच्चून हे उपजिल्हाधिकारी पुन्हा शहरात आले आहेत. पर्यटन महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारीपदी पदस्थापन झालेल्या या उपजिल्हाधिकारी महाशयांनी निवडणूक कामातही सहभाग घेतला आहे. महसूल, आरोग्य, ग्रामविकास, शिक्षण आदी विभागातील अधिकायांच्या या निवडणुकीमुळे बदल्या झाल्या, मात्र हे उपजिल्हाधिकारी याला अपवाद उरल्याने अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून एका जिल्हयात तीन वर्ष सेवा झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले जातात. तीन वर्ष जिल्हयात सेवा देत या अधिकाऱ्यांचा अनेक राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकत्यांशी संपर्क येत असतो. त्याचा निवडणुकीवर कुठलाही परिणाम होऊ नये, यासाठी आयोगाकडून प्रत्येक निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर असे आदेश जारी केले जातात. त्यानुसार राज्यभरातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्हयातील महसूल,ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण यासह सरकारच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रभ्योदय मुळे यांचीही बीड येथे बदली करण्यात आली होती, मात्र त्यांनी आयोगाच्या जिल्हा बदलीला थेट आव्हान देत पुन्हा छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटन महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारीपदी बदली करून घेतली.
बदली झाल्यानंतर सहा महिने त्यांच्या जागी दुसरा उपजिल्हाधिकारी न आल्याने प्रादेशिक सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी पदाची सूत्रे प्रभ्योदय मुळे यांच्याकडेच होती, हे विशेष. वास्तविक पाहता या पदाचा पदभार इतर उपजिल्हाधिकारी यांच्याकडे देता आला असता, मात्र प्रशासनाने तसे न करता त्यांच्याकडे या पदाची जवाबदारी दिली. हा सर्वच प्रकार संभ्रम निर्माण करणारा आहे.
प्रभ्योदय मुळे यांनी पुन्हा छत्रपती संभाजीनगरात बदली करुन घेतली. हा जेवढा गंभीर प्रकार आहे, त्यापेक्षा गंभीर प्रकार म्हणजे निवडणूक विभागाने त्यांना निवडणूक कामात सहभागी करून घेत पोस्टल मतदान आणि घरुन मतदान करणाऱ्या वयोवृद्ध आणि दिव्यांगांच्या मतदानाची सोय करण्याची जबाबदारी दिली आहे. यासाठी त्यांना झोनल अधिकारी म्हणून नियुक्तही करण्यात आले आहे. निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या यादीत त्यांचे नावही झळकले आहे.
दरम्यान, निवडणूक कामात हलगर्जी किंवा चूक झाल्यास त्या अधिकारी किंवा कर्मचान्यांवर कठोर कारवाई केली जाते. जिल्हघात अशा कारवाया झालेल्या आहेत. प्रभ्योदय मुळे यांनी पुन्हा शहरात वदली करुम घेत आयोगाला आव्हान दिले असल्याने आता त्यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हाधिकारी काय म्हणाले…
उपजिल्हाधिकारी प्रभ्योदय मुळे यांच्या बदली प्रकरणासंदर्भात आज बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी युक्तिवाद केला. आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा बदली झाल्यानंतर निवडणूक होण्यापूर्वी पुन्हा जिल्हघात बदली होते का, या प्रश्नावर ते म्हणाले, पर्यटन महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रभ्योदय मुळे यांना आम्ही निवडणुकीच्या प्रत्यक्ष कानात सहभागी करुन घेतलेले नाही. आम्हाला निवडणूक कामासाठी मोठ्या प्रमाणावर अधिकारी-कर्मचाऱ्यांची गरज असते, त्यामुळे त्यांना झोनल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली, मात्र कुणाची तक्रार असल्यास त्याची आम्ही दखल घेऊन योग्य ती कारवाई करू.
सरकारनेही आयोगाच्या आदेशाला हरताळ फासला !
निवडणूक आयोगाचे आदेश असतानाही जिल्हा बदली झालेले प्रभ्योदय मुळे यांनी पुन्हा शहरात बदली करून घेतली असली तरी ही बदली सरकारच्या आदेशाने झाली आहे. त्यामुळे सिंधे सरकारनेही आयोगाच्या आदेशाला हरताळ फासत आव्हान दिले आहे. जिल्ह्यात तीन वर्ष प्रशासकीय सेवा झालेल्या अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. ते बदलीच्या ठिकाणी रुजूही झाले. निवडणूक आयोगाच्या आदेशाने बदली झाली असल्याने ती रह होत नाही, हे त्यांना ज्ञात आहे. त्यामुळे कुठल्याच अधिकाऱ्याने बदलीसाठी प्रयत्नही केले नाही. मात्र प्रभ्योदय मुळे यांची एकमेव चदली झाली. यावरुन त्यांचा मंत्रालयात आणि मंत्र्यांकडे थेट वशिला आहे, हे स्पष्ट झाले आहे
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List