टॉक्सिक लोकांपासून दूर, नो अल्कोहोल; ब्रेकअपवरील भाष्यानंतर मलायकाची नवीन पोस्ट व्हायरल
अभिनेत्री मलायका सध्या अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपमुळे फार चर्चेत आहे. तसेच या परिस्थितीतून ती सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचेही तिने कित्येकदा सांगितले आहे.मलायकाने ब्रेकअपवर स्पष्टपणे तिचे मत मांडलं होतं. तिने अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपवर केलेल्या पोस्टही बऱ्याचदा व्हायरलही झाल्या. आता मलायकाची अजून एक पोस्ट व्हायरल झाली आहे.
मलायकाची आव्हानांची यादी
मलायका तिच्या फिटनेसवर किती मेहनत घेते हे सर्वांनाच माहित आहे. तिच्या व्यायामापासून ते खाण्यापर्यंत ती सगळे नियम अगदी काटेकोरपणे पाळते. ती नेहमी सोशल मीडियावर फिटनेसबाबत प्रेरणादायी पोस्ट शेअर करत असते.
मलायकाची एक नवीन पोस्ट सध्या सोशल माडियावर व्हायरल होत आहे. यात तिने कोणताही डाएट प्लॅन नाही तर नवीन महिन्यात कोणती आव्हाने ती स्विकारणार आहे याची एक यादीच तिने बनवली आहे. मलायकाने तिची नोव्हेंबर महिन्यातील आव्हानांची यादी शेअर केली त्यानंतर तिला यावर प्रचंड प्रतिसाद आला आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये नेमकं काय?
मलायकाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये नोव्हेंबर महिन्यात कोणती काळजी घ्यावी, काय करण्याची आवश्यकता आहे, याबाबत सांगितलं आहे. यामध्ये एकूण नऊ आव्हाने आहेत. अल्कोहोल सोडणे, ८ तास झोप, मार्गदर्शकाची गरज आहे, दररोज व्यायाम करणं, दररोज १० हजार पावलं चालणं, सकाळी १० वाजेपर्यंत उपवास, प्रक्रिया केलेलं अन्न टाळणं, रात्री ८ नंतर न जेवणं, टॉक्सिक लोकांपासून दूर राहणं अशी नऊ आव्हाने मलायकाने स्वीकारली आहेत.
काही दिवसांपूर्वी मलायकाने अर्जुन कपूरबरोबर ब्रेकअपवर भाष्य केलं होतं त्यानंतर आता तिची ही पोस्ट व्हायरल होतं आहे. मलायका परिस्थिती कशाही असो पण तिच्या सोशल मीडियावर नेहमी सकारात्मक गोष्टींच्याच पोस्ट दिसतात. २०१८पासून मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करत होते. सुरुवातीला दोघांनी नातं गुप्त ठेवलं होतं. पण काही काळानंतर दोघांनी जगजाहीर केलं. सोशल मीडियावर दोघं सतत रोमँटिक फोटो शेअर करत होते. अनेक कार्यक्रमांना एकत्र हजेरीही लावत होते. पण, आता दोघांचा ब्रेकअप झाल्यानंतर दोघांनीही यावरसुद्धा स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List