किडनीचे आरोग्य बिघडवणाऱ्या ‘या’ सवयी आजच सोडा, अन्यथा होईल वाईट परिणाम
Kidney Health Tips : आपल्या शरीरात दोन किडनी असतात. ज्यांचे काम रक्त शुद्ध करणे, हार्मोन्स तयार करणे, खनिजे तयार करणे, मूत्र तयार करणे आणि विषारी पदार्थ काढून टाकणे हे आहे. एका किडनीमध्ये किमान दहा लाख फिल्टर असतात. जे रक्त स्वच्छ करण्याचे देखील काम करतात.
किडनीने काम करणे बंद केले तर आपल्या शरीरात युरिया आणि क्रिएटिनिन जमा होतात. आम्ल संतुलन राखण्याचे कामही किडनी करते. पण आजकालच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यस्त जीवनशैली, संक्रमित पाणी, प्रदूषण यांसारख्या वाईट सवयीमुळे किडनी लवकर खराब होते. यासाठी डॉक्टर डायलिसिसचा सल्ला देतात. गंभीर समस्या असल्यास किडनी प्रत्यारोपण केले जाते. किडनीचे रक्षण करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतुलित आहार.
जसे की रक्त शुद्ध करणे हार्मोन्स तयार करणे. खनिजे शोषून घेणे. लघवी तयार करणे, विषारी पदार्थ काढून टाकणे आणि आम्ल संतुलन राखण्याचे काम किडनी करते. यावरून तुम्हाला समजले असेलच की किडनी हा आपल्या शरीरात किती महत्त्वाचा भाग आहे. पण नकळत तुमच्या काही सवयी तुमच्या किडनीला हानी पोहचवतात.
आजच सोडा या सवयी
कमी पाणी पिणे : कमी पाणी प्यायल्याने किडनीतील रक्त नीट फिल्टर करू शकत नाही. कारण रक्तामध्ये सर्वात जास्त पाणी असते. त्यामुळे शरीरात विषारी पदार्थ तयार होतात. याशिवाय पाणी कमी पिल्याने किडनी स्टोनची समस्या उद्भवते. त्यामुळे किडनी निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे.
गोड कमी खा : गोड जास्त खाल्ल्याने लघवीतून प्रथिने बाहेर पडतात. त्यामुळे किडनीमध्ये अनेक आजार होतात, म्हणून जेवणात किंवा इतर वेळी देखील नेहमी गोडाचे पदार्थ कमी खा.
धूम्रपान टाळा : धूम्रपानामुळे किडनीला रक्तपुरवठा कमी होतो. यामुळे एथेरोस्क्लेरोसिस हा आजार होतो. याशिवाय धूम्रपानंमुळे किडनीचे कार्यही कमी होते. त्यामुळे धूम्रपान करू नका.
झोपेची कमी : झोपेच्या कमतरतेमुळे किडनी निरोगी राहत नाही, कारण त्याचा चयापचयवर परिणाम होतो त्यामुळे नेहमी पुरेशी झोप घ्या.
डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List