त्यांना फक्त खोके मिळाले, अख्खी शिवसेना घेऊन गेलो असतो तर गोदाम कमी पडली असती; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

त्यांना फक्त खोके मिळाले, अख्खी शिवसेना घेऊन गेलो असतो तर गोदाम कमी पडली असती; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

महाराष्ट्रातील विधानसभा लढतीचं चित्र अखेर स्पष्ट झालेले आहे. काल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.आज पासून प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरातून अंबाबाईचे दर्शन घेत आपल्या प्रचाराला सुरुवात केली. कोल्हापूरातील राधानगरीत झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी खोके सरकारवर तोफ डागली आहे.उद्धव ठाकरे म्हणाले की आताची लढाई महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्रद्रोही यांच्यासोबतची आहे. महाराष्ट्र प्रेमी आघाडी सोबत आहे. मी लढायला मैदानात उतरलो आहे. साथ देणार आहात? लढणार आहात? विजय देणार आहात? (लोकांचा आवाज हो) मग भाषण करण्याची गरज काय अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी शाब्दीक कोटी केली आहे.

इथल्या विजयाची जबाबदारी सतेज यांच्यावर टाकतो

उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की कोल्हापुरातून चांगली सुरुवात झाली. कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेतलं. बाळू मामांचे आशीर्वाद घेतले. आता तुमचं दर्शन घेऊन पुढे जाणार आहे. तुमचा उत्साह पाहिल्यानंतर हा राधानगरी मतदारसंघ गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही यात शंका नाही.मधल्या काळात ग्रहण लागलं. मी तुमची हात जोडून माफी मागतो. ती चूक माझ्याकडून झाली. पण तुम्ही मोठ्या मनाचे. तुम्ही सर्व केलं. आमदार तुम्ही केलं. मी उमेदवारी दिली. तुमच्या पाठीत वार करायला काही लोक उभे आहेत. आणखी काय द्यायचं होतं. आमदार केलं. मान सन्मान प्रेम दिलं सर्व दिल्यानंतर शिवसेना नावाच्या आईवर वार करणारा माणूस तुमचा होऊ शकतो का. एका गोष्टीचं बरं वाटलं. सतेज सोबत आहेत असेही उध्दव ठाकरे यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की सतेज तुमचं नाव घेतल्यावर उत्साह पाहिला. एक गोष्ट चांगली झाली का म्हटलं कारण इथल्या विजयाची जबाबदारी मी सतेजवरच टाकतोय. शाहू महाराज सोबत आहेत. त्यांचे आशीर्वाद आहेत. हा जोश पाहिजे. शिवरायांचा महाराष्ट्र हा जोशपूर्णच पाहिजे असेही उध्दव ठाकरे यावेळी सांगितले.

न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली, पण

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की तुमच्या मनात जो राग आहे. तो राग अडीच वर्ष आपण आपल्या हृदयात धगधगत ठेवला. कधी वेळ येते आणि खोके सरकारला भस्म करतोय ही वाट महाराष्ट्र पाहत होता. तो क्षण आला आहे. आपल्याला न्यायदेवतेकडून न्याय आला नाही. न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली. पण देशातील लोकशाही मरत आहे हे दिसत नाही. म्हणून मी तुमच्याकडे न्याय मागायला आलो आहे. त्यांना ५० खोके दिले. मी अख्खी शिवसेना घेऊ गेलो असतो तर काय झालं असतं. त्यांचं गोदाम रिकामं पडलं असतं. पण ही गद्दारी माझ्या रक्तात नाही. हा हरामखोरपणा रक्तात नाही. मी माझ्या महाराष्ट्राला गुलाम बनवून विकला जाणाऱ्यातील नाही. त्या औलादीचा नाही. मला आश्चर्याचा धक्का बसला केपी पाटील सांगत होते इथलं पाणी अदानीला विकलं जातं. मला वाटलं मुंबईच विकली की काय. संपूर्ण महाराष्ट्र अदानीला फुकट दिला जातो. आम्ही काय षंड म्हणून बघत बसणार. नामर्द म्हणून पाहत बसणार. मी आज बाळू मामांचे आशीर्वाद घेतले. त्यांना हातजोडून तीच विनंती केली. तुमचा धनगर समाज तडफडतोय, अस्वस्थ होतोय. त्याच्याकडे कोणी पाहत नाही. सर्वसमाज तोडूनफोडून टाकले आहेत असेही ठाकरे यावेळी बरसले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘हे गँगवार असू शकतं; हा नोट जिहाद’, विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया ‘हे गँगवार असू शकतं; हा नोट जिहाद’, विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरारच्या राड्यावर प्रतिक्रिया दिली आहे. विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांना...
मोठी बातमी! विरार कॅश कांड प्रकरण; विनोद तावडेंवर गुन्हा दाखल
Deepika Padukone : दीपिकाचं बाळ, डिप्रेशनची खिल्ली उडवल्याने सोशल मीडियावर संताप, ‘तिला आता समजेल, की…’
स्मरणशक्ती वाढवायची? ‘या’ 4 टिप्स फॉलो करा
Work From Home चा काहींना फायदा, काहींचं टेन्शन वाढलं, वाचा रिपोर्ट
विनोद तावडेंसारखे भाजपचे मोठे नेते हॉटेलच्या किचनमध्ये का लपले? बविआच्या कार्यकर्त्यांचा आरोप
विनोद तावडेंना तात्काळ अटक करा – रमेश चेन्नीथला