बारीक व्हायचं असेल तर या तीन गोष्टी नक्की करा, आजपासूनच करा सुरुवात

बारीक व्हायचं असेल तर या तीन गोष्टी नक्की करा, आजपासूनच करा सुरुवात

लठ्ठपणाची समस्या सध्या वाढत चालली आहे. बैठी काम करण्याची शैली तसेच बिघडलेले दैनंदिन जीवनाचे वेळापत्रक यामुळे भारतीय लोक लठ्ठपणाचे बळी होत चालले आहेत. लठ्ठपणामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होते. वाढत्या वजनाने अनेक दुखणी मागे लागतात. त्यामुळे काही सोपे उपाय जर अमलात आणले तर आपल्या शरीराची चरबी वितळण्यास मदत मिळू शकते. लठ्ठपणा आणि आपल्या आहार विहाराचा जवळचा संबंध आहे. जर आपण याविषयीचे नियम पाळले तर नक्की लठ्ठपणापासून वाचू शकतो.

सकस आणि भरपूर नाश्ता करावा –

जर तुम्हाला आपले वजन कमी करायचे असेल तर ब्रेकफास्ट मध्ये पोषक तत्वांनी भरपूर असलेल्या अन्नपदार्थांचा वापर केला पाहीजे. ब्रेकफास्ट करण्याचे कधी टाळू नये. यात आपण प्रोटीन, फायबर,ज्यूस, फळे, ओट्स आदीचा वापर करु शकता. प्रोटीनने भरपूर असलेला आहार घ्यावा. जंक फूड, मैदा, साखर, आणि तळलेले पदार्थ खाण्यापासून दूर रहावे. फळ आणि भाज्यांचा आहारात समावेश करावा. यात फायबर आणि पोषक तत्वाचं प्रमाण जास्त असते. कोबीच्या भाजीचा आहारात समावेश करावा, यातील टॅरटेरिक एसिड,शरीरातील कार्बोहायड्रेटचे चरबीत रुपांतर करीत नाही. जेवण करताना प्रत्येक घास नीट चावून चावून खावा.

सकाळी लवकर उठवण्याची सवय करा –

जर तुम्हाला आपले वजन कमी करायचे असेल सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करावा, आयुर्वेदानुसार रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठायला हवे. त्यामुळे अनेक आजारातून सुटका मिळते. सकाळी लवकर उठल्याने आपले शरीर सक्रीय राहाते आणि शरीर नीट कार्य करु लागते. त्यामुळे सक्रीय झालेल्या शरीरात चरबी देखील वेगाने वितळत असते.

रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यावे –

सकाळी उठल्यानंतर आपण कोमट पाणी उपाशीपोटी प्यायला हवे, त्यामुळे मेटबॉलिज्म वेगाने होते. आपले शरीराचे डिटॉक्सिफाय लवकर वेगाने होते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तुम्ही कोमट पाण्यात लिंबू रस टाकून प्यायल्यास ही फायदा होतो. जर यात मध, आल्याचा रस आणि एप्पल सायडर विनेगर मिळून देखील पिता येऊ शकते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आकाशातील ग्रह नक्षत्रांचे मत कुणाला? विधानसभेच्या निवडणुकीत बळ कोणत्या नेत्याला, शनिदेव कुणाला धडा शिकवणार, ज्योतिषांनी काय मांडला भविष्याचा पसारा? आकाशातील ग्रह नक्षत्रांचे मत कुणाला? विधानसभेच्या निवडणुकीत बळ कोणत्या नेत्याला, शनिदेव कुणाला धडा शिकवणार, ज्योतिषांनी काय मांडला भविष्याचा पसारा?
राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी मागे घेतल्यानंतर आता चित्र स्पष्ट झालं आहे. यावेळी अनेक चाणक्य आणि तज्ज्ञांना सुद्धा...
Aishwarya Rai : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन घेणार ग्रे डिव्होर्स? कित्येक वर्ष सोबत राहिल्यानंतर उतार वयात कपल्स घटस्फोट का घेतात?
IPL 2025 – जेम्स अँडरसनची पहिल्यांदाच मेगा लिलावात एन्ट्री, 1.25 कोटी बेस प्राईज!
AMAZON पार्सलमध्ये काय निघालं? पाहताच महिलेला आली उलटी; जाणून तुम्हालाही बसेल धक्का
आईसोबत वाद झाल्याने घराबाहेर… सहा नराधमांनी केला सामूहिक बलात्कार
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले; शेअर बाजाराने दाखवली तेजी, टेक्नोलॉजीच्या स्टॉकची भरारी
अंधार, निराशा, वेदना आणि भिती! अभिनेत्री मनिषा कोयराला पहिल्यांदाच कॅन्सरवर मोकळेपणाने बोलली