ऑनलाइन नोकरीच्या बहाण्याने फसवणूक

ऑनलाइन नोकरीच्या बहाण्याने फसवणूक

ऑनलाइन नोकरी सर्च केल्यानंतर वेबसाईट्सवर घरबसल्या काम उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांना व्हिडीओ लाईक करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा किंवा इन्स्टाग्राम पोस्ट लाईक करण्यास सांगून त्या बदल्यात लाखो रुपये मिळतील असे भासवले जाते आणि बेरोजगारांनी संपर्क केल्यानंतर काही रक्कम गुंतवण्यास सांगून अधिक नफा मिळवून देण्याचे खोटे सांगून लाखोंची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. गेल्या दहा महिन्यांत सायबर चोरट्यांनी पिंपरी – चिंचवड शहरातील सुमारे एक हजार जणांची या पद्धतीने फसवणूक केली आहे. याबाबत सायबर विभागाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

ऑनलाइन नोकरी सर्च केल्यानंतर हॅकर्स मोबाईलवर संपर्क करतात. वेबसाईट्सवर घरबसल्या काम उपलब्ध करून देण्याचे आमिष देऊन व्हिडीओ लाईक करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा किंवा इन्स्टाग्राम पोस्ट लाईक करा, अशी सोपी कामे देतात. याच्या बदल्यात लाखो रुपये मिळवून देणार असल्याचे सांगतात. बेरोजगारांनी संपर्क केल्यानंतर सुरुवातीला काही रक्कम देऊन त्यांचा विश्वास संपादित केला जातो. त्यानंतर काही रक्कम गुंतवण्यास सांगून अधिक नफा मिळवून देण्याचे खोटे सांगितले जाते. एकदा रक्कम गुंतवली की हॅकर्स काहीही प्रतिसाद देत नाहीत. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे बेरोजगार मंडळींच्या लक्षात येते. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.

ऑनलाइन नोकरी सर्च केल्यानंतर आपली इत्थंभुत माहिती हॅकर्सच्या हाती लागते. संबंधित माहितीच्या आधारे सायबर चोरटे निवृत्त कर्मचारी, गृहिणी, बेरोजगार तरुण यांना संपर्क करतात. यापूर्वीच्या गुन्ह्यात बळी पडलेल्यांमध्ये या घटकातील व्यक्तींची संख्या जास्त असल्याचे समोर आले आहे. गुगल किंवा मेटा अशा प्लॅटफॉर्मचा वापर करून हे हॅकर्स गरजू नागरिकांना हेरतात. ‘घर बैठे नोकरी करे, घर बैठे पैसे कमाये’ अशा प्रकारचे की वर्ड्स वापरले जातात. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या जाहिराती देऊन हॅकर्स मोठ्या प्रकारे फसवणूक करीत आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालयाने नोकरीसंदर्भात फसवणूक करणाऱ्या 100 च्या पुढे वेबसाईट्स आतापर्यंत ब्लॉक केल्या आहेत. सोशल मीडिया, टेक्स्ट मॅसेज, व्हॉट्सअ‍ॅप किंवा इतर माध्यमातून या वेबसाईट्स फसवणूक करत असल्याचे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. या वेबसाईट बंद झाल्या असल्या तरीही हॅकर्स वेगवेगळ्या वेबसाईटवरील डेटा चोरून फसवणूक करीत आहेत.

फसवणूक टाळण्यासाठी उपाययोजना

यू-ट्यूब व्हिडीओ किंवा इन्स्टाग्राम पोस्ट लाईक करणे ही नोकरी नसते.
व्हॉट्सअ‍ॅप, एसएमएस किंवा इतर ठिकाणांवरून आलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.
अनोळखी नावांनी आलेल्या लिंकवर क्लिक करू नका.
बँक खात्यासह गोपनीय माहिती शेअर करू नका.
कोणत्याही प्रकारे फसवणूक झाल्यास किंवा तसा संशय आल्यास नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल या वेबसाईटवर तक्रार नोंदवा.

ऑनलाइन नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. बेरोजगार तरुणांमध्ये जास्त बळी पडत आहेत. सायबर विभाग मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहे. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास फसवणूक टाळणे शक्य होईल, असे सायबर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ
मुंबईकरांना दूषित अन्न सेवनापासून परावृत्त करून आरोग्यदायी अन्न देण्यास प्रवृत्त करण्यासाठी सुमारे 10 हजार परवानाधारक खाद्यविव्रेत्यांना अन्न सुरक्षा नियम, अन्न...
पूजा खेडकरला अटक होणार, दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
परप्रांतीय रिक्षाचालकांवर तातडीने कारवाई करा! शिवसेनेची विलेपार्ले पोलिसांकडे मागणी 
वांद्रे येथील भारतीय विमा संस्थानात वेतनवाढ करार; भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या पाठपुराव्याला यश 
‘म्युच्युअल फंड सही है’ जाहिरातीविरुद्ध याचिका
सनी लिओनी घेत होती सरकारी योजनेचा लाभ
दहशतवाद्यांच्या साथीदाराला मुंबईतून ठोकल्या बेड्या