देवेंद्र फडणवीस नतद्रष्ट माणूस; मुंब्य्रात काय पाकिस्तानातही शिवरायांचं मंदिर उभारू, संजय राऊत यांचा पलटवार

देवेंद्र फडणवीस नतद्रष्ट माणूस; मुंब्य्रात काय पाकिस्तानातही शिवरायांचं मंदिर उभारू, संजय राऊत यांचा पलटवार

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारणार नाही, तर प्रत्येक जिल्ह्यात महाराजांचे भव्य मंदिर उभारणार, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातील प्रचारसभेमध्ये केली. याची देवेंद्र फडणवीस यांनी तोंड वेंगाडून चेष्टा केली. एवढेच नाही तर मुंब्य्रात शिवरायांचे मंदिर उभारून दाखवण्याचे आव्हान दिले. याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले असून मुंब्य्रात काय पाकिस्तानातही शिवरायांचं मंदिर उभारु असा जोरदार पलटवार केला.

उद्धव ठाकरे यांच्या घोषणेमुळे देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री मिंधे यांच्या पोटात कालवाकालव सुरू झाली आहे. मिंधेच्या राजवटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला, भ्रष्टाचारामुळे सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर महाराष्ट्राचा पुतळा कोसळून पडला, शिवरायांचा स्वाभिमान फडणवीस, मिंधे, अजित पवारांनी दिल्लीच्या चरणी गहाण ठेवला. ते वारंवार दिल्लीपुढे झुकताहेत. त्यामुळे महाराष्ट्राला प्रेरणा मिळावी म्हणून शिवरायांचे मंदिर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात उभारू असे उद्धव ठाकरे सांगतात आणि लोक प्रतिसाद देतात त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखणे साहजिक आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

फडणवीसांनी या संकल्पनेची चेष्टा केली. त्यांनी पुन्हा शिवरायांचा अपमान केला. शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्या फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या घोषणेची खिल्ली उडवली. मुंब्य्रात उभारा म्हणता… मुंब्य्रात काय पाकिस्तानातही शिवरायांचं मंदिर उभारु. पण मुंब्य्राच्या प्रवेशद्वारावर शिवरायांचा पुतळा आहे हे फडणवीस यांना माहिती आहे का? असा सवाल करत राऊत म्हणाले की, बटेंगे तो कटेंगे हे धोरण चालत नसल्याने शिवरायांचा गैरवापर करून मुसलमानांना बदनाम करत आहेत. फडणवीस यांचे पूर्वज मोगलांचे चाकरी करत होते, हा इतिहास बघा. मराठ्यांच्या राज्यात फडणवीसगिरी दाखवू नका, असा घणाघात राऊत यांनी केला.

शिवरायांचे मंदिर उभारण्याची घोषणा केल्याने त्यांना त्रास होतो. ते जरांगे-पाटलांचीही चेष्टा करतात. मराठा आंदोलनाचीही चेष्टा करतात. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवरायांच्या प्रेरणेतून उभ्या केलेल्या शिवसेनेचीही चेष्टा करतात. महाराजांविषयी तुमच्या मनात एवढा द्वेष का? याचे कारण फडणवीस यांचे प्रेम शिवरायांच्या महाराष्ट्रावर नसून गुजरातवर आहे. शिवरायांनी जी सूरत लुटली त्या सूरतवर त्यांचे प्रेम आहे, असेही राऊत म्हणाले.

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे काय झाले? या अशा चेष्टेखोर भूमिकेमुळे शिवरायांचे स्मारक होऊ शकले नाही. तुम्ही म्हणाल तिकडे आम्ही मंदिर बांधून देऊ. तुमची हिंमत आहे का मंदिरात यायची. फडणवीस शिवरायांचे द्वेष्ठे असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे, अशी टीका राऊत यांनी केली. तसेच त्यांना अफझलखानाच्या लोकांनी घेरल्याने शिवरायांच्या मंदिराला विरोध करत करत आहेत. शिवरायांच्या मंदिराला फडणवीस हा नटद्रष्ट माणूस विरोध करतोय. मराठी माणसाने हे विसरू नये, त्यांना जाब विचारावा, असेही राऊत यावेळी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ
मुंबईकरांना दूषित अन्न सेवनापासून परावृत्त करून आरोग्यदायी अन्न देण्यास प्रवृत्त करण्यासाठी सुमारे 10 हजार परवानाधारक खाद्यविव्रेत्यांना अन्न सुरक्षा नियम, अन्न...
पूजा खेडकरला अटक होणार, दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
परप्रांतीय रिक्षाचालकांवर तातडीने कारवाई करा! शिवसेनेची विलेपार्ले पोलिसांकडे मागणी 
वांद्रे येथील भारतीय विमा संस्थानात वेतनवाढ करार; भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या पाठपुराव्याला यश 
‘म्युच्युअल फंड सही है’ जाहिरातीविरुद्ध याचिका
सनी लिओनी घेत होती सरकारी योजनेचा लाभ
दहशतवाद्यांच्या साथीदाराला मुंबईतून ठोकल्या बेड्या