टाईप – 2 डायबिटीजपासून वाचण्याचे सोपे उपाय आणि डाएट टिप्स पाहा
हल्लीच्या धावपळीच्य जीवनात अनेक जणांना डायबिटीज सारखे आजार होत आहे. पूर्वी वृद्धांना हा आजार होत असायचा. आता महिलांना, तरुणांना आणि पन्नाशीच्या पुरुषांना देखील डायबिटीज होत आहे. आता काही जणांना चाळीशीत हा आजार होत आहे. महिलांना देखील हा आजार होत असल्याने महिलांनी काय काळजी घ्यावी ? काय आहार घ्यावा ते पाहूयात…
डायबिटीजची वाढते प्रकार
टाईप टू डायबिटीज असलेल्या लोकांना आहार आणि बदलत्या जीवनशैलीने हा आजार होतो. अशा आजारात आपली जीवनशैली चांगली असायला हवी, लवकर झोपणे आणि लवकर उठणे, योग्य आहार घेण्याने आणि महत्वाचे म्हणजे सक्रीय राहील्याने आपल्याला या आजारात फायदा होतो.
महिलांचा बराचसा वेळ मोबाईल फोनचा वापर करण्यात जात आहे. तसेच पीठापासून तयार केलेले पदार्थ जास्त खाल्ले जात आहेत. त्याच सोबत मानसिक ताण देखील वाढत आहे. त्यामुळे महिलांमध्ये टाईप – 2 डायबिटीजचे प्रमाण वाढत आहे.त्यामुळे आपल्या जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात बदल करायला हवेत.
वेळेवर जेवायला पाहीजे
आपल्या जीवनात ताण- तणावापासून दूर राहायला हवे. तसेच वेळेवर जेवण करायला हवे, तसेच पिठाचे पदार्थांचा आहारात कमी वापर करायला हवा. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळ भाज्या, फळे आणि डाळींचा वापर करायला हवा. तसेच यासोबत व्यायाम देखील करायला हवा.
तुम्हाला जर जिमला जाता येत नसेल तर सकाळी फिरायला तुम्ही जाऊ शकता, ताण- तणावामुळे डायबिटीजचे प्रमाण वाढत आहे. डायबिटीजला योग्य आहार, व्यायाम, ताणतणावमुक्त जीवनशैलीमुळे आपण दूर ठेवण्यास आपल्याला यश मिळेल असे तज्ज्ञांचे मत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List