आता भारताला ‘या’ आजाराचा विळखा, कोरोनापेक्षाही आहे महाभंयकर, वाचा ‘WHO’ चा रिपोर्ट

आता भारताला ‘या’ आजाराचा विळखा, कोरोनापेक्षाही आहे महाभंयकर, वाचा ‘WHO’ चा रिपोर्ट

जागतिक आरोग्य संघटनेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार भारतासह पाच देशांमध्ये टीबीचे सर्वाधिक रुग्ण असून टीबी हा कोरोना पेक्षाही धोकादायक संसर्गजन्य आजार असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय. भारतात टीबीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात, असाही यात उल्लेख आहे.

टीबी हा अतिशय धोकादायक संसर्गजन्य आजार आहे. हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज पसरू शकतो हे फार कमी लोकांना माहित आहे.

जागतिक क्षयरोग अहवाल काय सांगतो?

भारतात टीबीचे 26 टक्के, इंडोनेशियात 10 टक्के, चीनमध्ये 6.8 टक्के, फिलिपिन्समध्ये 6.8 टक्के आणि पाकिस्तानात 6.3 टक्के रुग्ण आढळले आहेत. जागतिक क्षयरोग अहवाल 2024 नुसार जागतिक स्तरावर या आजाराचे प्रमाण 56 टक्के आहे.

भारतात टीबीचे सर्वाधिक रुग्ण

जागतिक स्तरावर टीबी हा आजार 55 टक्के पुरुष, 33 टक्के महिला आणि 12 टक्के मुले आणि तरुणांमध्ये आढळतो. भारताने 2025 पर्यंत देशातून टीबी या आजाराचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले असले तरी अजूनही भारतात सर्वाधिक रुग्ण आहेत.

2023 मध्ये अंदाजे 8.2 दशलक्ष लोकांना या आजाराचे निदान झाले आहे. टीबीशी संबंधित मृत्यूंची संख्या 2022 मधील 1.32 दशलक्षवरून 2023 मध्ये 1.25 दशलक्षपर्यंत कमी झाली आहे, जरी टीबीमुळे आजारी पडणाऱ्यांची एकूण संख्या किंचित वाढून 2023 मध्ये अंदाजे 10.8 दशलक्ष झाली आहे, अशी माहिती डब्ल्यूएचओच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात नमुद करण्यात आली आहे.

टीबीचा आजार का होतो?

टीबीचा आजार मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो. जेव्हा एखादी व्यक्ती या टीबी जीवाणूच्या संपर्कात येते तेव्हा हा जीवाणू श्वासाद्वारे निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. ज्यानंतर तो फुफ्फुसात स्थिरावतो, ज्यामुळे फुफ्फुसांवर वाईट परिणाम होऊ लागतो. हे बॅक्टेरिया संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून पसरतात. संक्रमित व्यक्तीच्या खोकला आणि शिंकण्यामुळे ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतात.

टीबीचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे सतत खोकला, त्यामुळे जर खोकला तीन आठवडे किंवा त्याहून अधिक काळ कायम राहिला तर त्याची तपासणी करून पूर्ण खबरदारी घेऊन त्यावर योग्य उपचार करून घ्यावेत.

उपचार शक्य आहे का?

चांगली गोष्ट म्हणजे या आजारावर उपचार पूर्णपणे शक्य आहेत. पण एकदा उशीर झाला की रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे सतत खोकला येत असेल तर त्याची तपासणी करून योग्य उपचार करावेत.

टीबी आजाराची लक्षणं कोणती?

खोकला, खोकल्यासह रक्त, छातीत दुखणे जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा खोकला येणे, ताप, थंडी, रात्री घाम येणे, वजन कमी होणे, खाण्याची इच्छा कमी होणे, थकवा जाणवणे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्र तुटू देणार नाही, महाराष्ट्र लुटू देणार नाही! अंबामातेचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे यांनी फुंकले रणशिंग महाराष्ट्र तुटू देणार नाही, महाराष्ट्र लुटू देणार नाही! अंबामातेचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे यांनी फुंकले रणशिंग
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबामातेचे दर्शन घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महाविकास आघाडीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. राधानगरी...
आज मुंबईत महाविकास आघाडीची दणदणीत सभा! राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या तोफा धडाडणार
‘सामना’चे जीमेल, यूटय़ुब चॅनेल हॅक, गैरवापर रोखण्यासाठी सायबर सेलकडे तक्रार
कुठेतरी थांबले पाहिजे! शरद पवारांचे संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत
ठसा – श्याम मोकाशी
सामना अग्रलेख – हिंदू खतरे में! योगींना कॅनडात पाठवा
अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार? अटीतटीच्या लढाईसाठी मतदान सुरू; विजयाची समान संधी असल्याचा अंदाज